धक्कादायक घटना...भंगाराचे पैसे दिले नाही म्हणून मित्रानेच केली मित्राची हत्या...
पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी भागात प्रेमबहादुर करण थापा या ४० वर्षीय भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती.
प्रेमबहादुर थापाचा हत्येच छळा लावण्यात हिंजवडी पोलिसांना यश आल आहे. प्रेमबहादुर थापा हत्या प्रकरणात हिंजवडी पोलिसांनी अनिल राई ह्या ३३ वर्षाच्या आरोपीला अटक केली आहे.
तर याच हत्या प्रकरणात इतर दोन संशयित आरोपींना हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. भंगार विक्रीतून गोळा झालेल्या पैसे वाटणीच्या वादातून, अनिल राई आणि त्याच्या सहकाऱ्यांनी प्रेम बहादूर थापा ची हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाला आहे.
प्रेम बहादूर थापाची हत्या केल्यानंतर अनिल राई हा फरार झाला होता. मात्र हिंजवडी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण करून अनिल राई याला अटक केली आहे.
0 Comments