मोठी बातमी..पालखी सोहळ्याचे ड्रोन छायाचित्रण करण्यास बंदी,
अपर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांचे आदेश
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवल्यानंतर पुणे, सोलापूर जिह्यांतून जाणाऱया पालखी सोहळय़ाचे ड्रोन कॅमेऱयाद्वारे छायाचित्रण करण्याकर बंदी घालण्यात आली आहे.
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973च्या कलम 144 अन्कये अपर जिल्हादंडाधिकारी शमा पकार यांनी याबाबत अधिसूचना काढली आहे.
सोलापूर ग्रामीण जिह्यात महत्त्काची धार्मिक स्थळे, धरणे, केंद्रीय संस्था असून, करिष्ठ कार्यालयाकडून केळोकेळी आलेल्या सूचनेनुसार तसेच गोपनीय माहितीनुसार दहशतवादी कारवायांमध्ये ड्रोन कॅमेऱयाद्वारे टेहळणी करून त्याचा अतिरेकी कारकायांमध्ये उपयोग केला जाण्याची शक्यता असते.
आगामी 21 जून 2023 ते 4 जुलै 2023 या काळात आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, संत श्री तुकाराम महाराज, संत श्री निवृत्तीनाथ महाराज, संत श्री सोपानदेव महाराज, संत श्री नामदेव महाराज, संत श्री एकनाथ महाराज, संत मुक्ताबाई व संत श्री गजानन महाराज या मानाच्या पालख्या पायी चालत पंढरपूरच्या दिशेने येणार आहेत.
त्यांच्यासोबत महाराष्ट्रातून व इतर प्रांतांतून लाखो भाविक वारकरी येतात. 28 जून 2023 रोजी पंढरपूर येथे सर्व पालख्या एकत्र येणार आहेत. त्याकेळी पंढरपूर येथे वारकऱयांची 12 ते 14 लाख एकढी संख्या असते.
तसेच लाखो भाविक मंदिर तसेच मंदिर परिसरात एकाच ठिकाणी एकवटलेले असतात. सदर ठिकाणी विशेषतः वेगवेगळ्या नदी घाटांवर सोलापूर जिल्ह्यातून येणाऱया सर्व पालखीमार्गावर बरेच टीव्ही. चॅनल्स, खासगी व्यक्ती, संस्था यांच्याकडून पालखी सोहळ्याचे छायाचित्रण होत असते.
अलीकडील काळातील दहशतवादी घटनांचा विचार करता पालखी सोहळ्यात ड्रोन कॅमेऱयांद्वारे छायाचित्रण होऊन त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सदर पालखी सोहळ्यात व आषाढीवारी कालावधीत येणाऱया वारकऱयांमध्ये जास्तीत जास्त वारकरी ग्रामीण भागातील असून, त्यांना ड्रोन कॅमेरा ज्ञात नसतो.
त्यामुळे अचानक ड्रोनसारख्या साधनांद्वारे जर छायाचित्रण करण्यात आले, तर वारकऱयांमध्ये अफवा पसरून गोंधळ उडून चेंगराचेंगरीसारखा प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याकरिता सोलापूर ग्रामीण जिह्यात 20 जून 2023 ते 4 जुलै 2023 या कालावधीत पालखी सोहळ्याच्या संपूर्ण मार्गावर व पंढरपूर येथील आषाढीवारीमध्ये ड्रोन कॅमेऱयाद्वारे छायाचित्रण करण्यावर बंदी घालण्यात येत आहे.


0 Comments