google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक प्रकार... माहेरी येऊन नवविवाहितेची प्रियकरासह आत्महत्या

Breaking News

धक्कादायक प्रकार... माहेरी येऊन नवविवाहितेची प्रियकरासह आत्महत्या

धक्कादायक प्रकार... माहेरी


येऊन नवविवाहितेची प्रियकरासह आत्महत्या

जळगाव पाचोरा शहरातील मोंढाळे रोडवरील पडक्या शाळेच्या खोलीत प्रेमीयुगुल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. 

सोमवारी ही घटना उघडकीस आली. या घटनेतील तरुणीच्या घरच्यांनी दोन दिवसांपूर्वी तिचे दुसऱ्या मुलाशी लग्न लावून दिले. 

मात्र, हे लग्न मान्य नसल्याने तरुणीने प्रियकरासोबत आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. 

जितेंद्र राजू राठोड (वय १९) आणि साक्षी सोमनाथ भोई (वय १९) असे आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाची नावे आहेत. हे दोघेही पाचोरा येथील वरखेडी नाका परिसरात राहत होते.

 दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. परंतु, कुटुंबियांकडून दोघाच्या लग्नाला विरोध होता. 

यातच दोन दिवसांपूर्वी साक्षीच्या घरच्यांनी तिचे दुसऱ्या मुलासोबत लग्न लावून दिले. या लग्नाला साक्षीचा विरोध होता. 

यानंतर माहेरी आलेल्या साक्षीने जितेंद्र यांच्यासोबत पडक्या शाळेच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. 

रविवारी रात्री जितेंद्रने साक्षीला फोन केला. घराच्या मागे असलेल्या मोंढळा रोडवरील पडक्या शाळेच्या ठिकाणी भेटायचे ठरवले.

 सोमवारी पहाटे साक्षीच्या भावाला जाग आली. पण साक्षीच कुठेच दिसत नसल्याची माहिती त्याने कुटुंबियांना दिली. 

यानंतर घरच्यांनी तिचा शोघ घेतला असता घरामागील पडक्या शाळेत साक्षी आणि जितेंद्र गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.

Post a Comment

0 Comments