google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मंगळवेढ्यात माहेरी असलेल्या पत्नीला आणण्यासाठी निघालेल्या पतीचा मृत्यू; सांगोला-मंगळवेढा रोडवरील घटना

Breaking News

मंगळवेढ्यात माहेरी असलेल्या पत्नीला आणण्यासाठी निघालेल्या पतीचा मृत्यू; सांगोला-मंगळवेढा रोडवरील घटना

 मंगळवेढ्यात माहेरी असलेल्या पत्नीला आणण्यासाठी निघालेल्या पतीचा मृत्यू; सांगोला-मंगळवेढा रोडवरील घटना


माहेरी गेलेल्या पत्नीला परत आणण्यासाठी गेलेल्या पतीस कारने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. हा अपघात 30 मे रोजी झाला होता.

उपचारादरम्यान मृत्यू झाला. जयवंत दिलीप काळे (वय 33, रा. धुळगाव, ता. तासगाव, जि. सांगली) असे अपघातामध्ये मयत झालेल्याचे नाव आहे.

जयवंत काळे हे पत्नी उज्वला यांना घेऊन जाणण्यासाठी (खडकी, ता. मंगळवेढा) येथे दुचाकी वरून (एमएच- १३ / डी - ४३५७) धुळगाव येथून मंगळवेढा येथील खडकीकडे जात होते.

सांगोला ते मंगळवेढा रोडवरून जात असताना समोरून भरधाव येणाऱ्या कारने (एपी-०२ / बीजी-५०१४) दुचाकीला समोरून जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला.

अपघातात जयवंत गंभीर जखमी झाल्याने बबन बिरा काळे (रा. मंगळवेढा) याने त्यास सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान २ जून रोजी सकाळी 6.44 च्या समाराम त्याचा मृत्यू झाला.

Post a Comment

0 Comments