google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज... 5 खून करणाऱ्या आरोपीला 20 वर्षानंतर ग्रामीणच्या पोलिसांनी केली अटक करून न्यायालयात हजर केले.

Breaking News

ब्रेकिंग न्यूज... 5 खून करणाऱ्या आरोपीला 20 वर्षानंतर ग्रामीणच्या पोलिसांनी केली अटक करून न्यायालयात हजर केले.

ब्रेकिंग न्यूज... 5 खून करणाऱ्या आरोपीला 20 वर्षानंतर


ग्रामीणच्या पोलिसांनी केली अटक करून न्यायालयात हजर केले.

स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची धडाकेबाज कामगिरी *पाच खुन करुन आजन्म कारावासाची शिक्षा शाबीत झालेला व सदर शिक्षेपासुन मागील 20 वर्षा पासुन अस्तित्व लपवुन राहणारा जाफर बाळू पवार वय 60रा.सिध्दापूर तालुका मंगळवेढा, सोलापूर या आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे.

अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टेशन नंबर 06/1992 भादंवि क 302, 147, 148, 326, 504, 506 प्रमाणे दाखल असुन सदर गुन्हयांत आरोपींनी य दोन महिला व तीन मुलांना जिवे ठार मारले होते. 

नमुद गुन्हयात मा. सत्र न्यायालय सोलापूर यांनी दि. 15/12/1994 रोजी आरोपी जाफर बाळू पवार याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यातील आरोपी यांनी मा. उच्च न्यायालय मुंबई येथे सदर शिक्षे विरोधात अपिल केले होते. 

मा. उच्च न्यायालय मुंबई यांनी सदर अपिल दिनांक 18/05/2005 रोजी फेटाळले असुन तेव्हा पासुन आरोपी मिळुन येत नव्हता. मा. सत्र न्यायालय सोलापूर यांनी सदर आरोपी यास पकडणे बाबत स्थायी वॉरंट काढले होते. 

नमुद गुन्हयाची तीव्रता लक्षात घेवुन मा. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सदर स्थायी वॉरंट बजावणीसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांना आदेशीत केले होते. 

सदर आरोपी हा रेकॉर्ड वरील आरोपी असुन त्याचे विरुध्द खुन, दरोडा, खुनासह दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, फसवणुक सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे गुरनं 06/1992 भादंवि क 302, वगैरे या पाच जणाच्या खुनांच्या गुन्हयात मा. न्यायालयाने सुनावलेली आजन्म कारावासाची शिक्षा टाळण्याकरीता 

आरोपी हा मागील 20 वर्षा पासुन त्याचे अस्तित्व लपविण्याकरीता वेगवेगळया ठिकाणी राहत असे. स्थानिक गुन्हे शाखेकडील सहा.पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व पोउपनि सुबोध जमदाडे यांचे पथकाने आरोपी याची गुप्त् बातमीदारा मार्फत माहिती प्राप्त् केली. 

प्राप्त् माहिती प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन्ही पथकांनी दिनांक 05/06/2023 रोजी सिध्दापूर ता. मंगळवेढा येथे सापळा रचुन आरोपीचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. आरोपी यास मा. सत्र न्यायालय सोलापूर यांचे न्यायालयात हजर केला असता,

 मा. सत्र न्यायालय सोलापूर यांनी सदर आरोपीस आजन्म कारवासाची शिक्षा भोगण्याकरीता कारागृहात रवानगी केली आहे. सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण शिरीष सरदेशपांडे, व अपर पोलीस अधीक्षक, हिम्मत जाधव, यांचे मार्गदर्शनाखाली

 वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण. यांचे नेत्तृत्वाखाली सहा.पोलीस निरीक्षक/ धनंजय पोरे, पोउपनि/सुबोध जमदाडे, श्रेणी पोसई/ राजेश गायकवाड, सपोफौ/श्रीकांत गायकवाड, सपोफौ/शिवाजी घोळवे, 

पोहवा/परशुराम शिंदे, सलीम बागवान, हरिदास पांढरे, आबासाहेब मुंढे, पोना/रवी माने, मपोना/ज्योती काळे, पोकॉ/ अजय वाघमारे, समर्थ गाजरे, सुरज रामगुडे, यश देवकते, चालक पोहवा/ प्रमोद माने, चालक पोशि/दिलीप थोरात, यांनी केली आहे.

खून आरोपीला जेरबंद

Post a Comment

0 Comments