google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 संसद भवनाच्या नवीन इमारतीला भारताचे पहिले कायदा मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे : सुरजदादा बनसोडे अशा मागणीचे निवेदन देण्याची नियोजन बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन सांगोला येथे संपन्न

Breaking News

संसद भवनाच्या नवीन इमारतीला भारताचे पहिले कायदा मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे : सुरजदादा बनसोडे अशा मागणीचे निवेदन देण्याची नियोजन बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन सांगोला येथे संपन्न

 संसद भवनाच्या नवीन इमारतीला भारताचे पहिले कायदा मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे :


सुरजदादा बनसोडे अशा मागणीचे निवेदन देण्याची नियोजन बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन सांगोला येथे संपन्न

सांगोला/(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) :

काल सोमवार दि. 29 मे रोजी स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव नवीन संसद भवनाच्या इमारतीला देण्यात यावे या मागणीचे निवेदन देण्याच्या नियोजनाची बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनमध्ये 

सांगोला तालुक्यातील काही आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.  सदरच्या मागणी बरोबरच दिल्लीतील महाराष्ट्र सदना मध्ये सावरकर यांची जयंती साजरी करताना अहिल्यादेवी होळकर व सावित्रीमाई फुले यांचे पुतळे हटवल्याचा निषेध केला जाणार आहे. 

तसे निवेदन सांगोला तालुक्यातील बहुजन बांधवांच्या वतीने तहसीलदार यांना 2 जूनला दुपारी 11 वाजता देण्याचे बैठकीत ठरले आहे. तरी या कार्यक्रमास तालुक्यातील बहुजन बांधवांनी मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन माजी नगरसेवक सुरजदादा बनसोडे यांनी केले आहे. 

या बैठकीस आर. पी. आय. पश्चिम महाराष्ट्र संघटक अरुण आण्णा बनसोडे , सांगोला जयंती मंडळाचे अध्यक्ष सचिन सावंत, अमोल राजू बनसोडे, लकी कांबळे, नाना सोनवणे, गुणवंत जगधने, लखन माने, गोट्या लोखंडे, केतन शेळके, प्रवीण वाघमारे, माणिक सकट, सचिन सावंत, दीपक होवाळ, केरप्पा सरवदे, बाळू ठोकळे, अमोल गेजगे, किरण ऐवळे, शुभम ऐवळे, अनिल पारशे,  प्रकाश ऐवळे, 

ओंकार भडंगे, दत्ता जावीर, दादासाहेब तोरणे, बाळासाहेब भजनावळे, अतुल गेजगे, आकाश ऐवळे, लिंगा तोरणे, प्रमोद ऐवळे, ऋनील चंदनशिवे, सचिन धांडोरे, समाधान धांडोरे, युवराज ठोकळे, उत्कर्ष वाघमारे, अर्जुन चंदनशिवे, विशाल गुळीग, सर्जेराव शेळके इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments