ब्रेकिंग न्यूज.. सबसे कातील गौतमी पाटील 'या' तारखेला मंगळवेढ्यात; तोबा गर्दी होण्याची शक्यता
सबसे कातील असं म्हंटल्यावर आपसूकच गौतमी पाटील असं नाव ज्याच्या तोंडून बाहेर पडणार नाही असा माणूस सध्या शोधून सापडणार नाही.
संपूर्ण महाराष्ट्रात गौतमी पाटील हे नाव परिचित झाले आहे. गौतमी पाटील या नृत्यांगणेने महाराष्ट्रातील तरुणाईला अक्षरशः वेड लावले आहे. गौतमी पाटील ज्या कार्यक्रमाला असते तिथे तरुणाईची तूफान गर्दी होत असते. हीच गौतमी पाटील ५ जून मंगळवेढामध्ये लावणी महोत्सवात थिरकणार आहे.
महाराष्ट्रासह देशभरात सध्या नृत्यांगणा गौतमी पाटीलचं नाव चर्चेत आहे. तिच्या नृत्यावर आक्षेप घेतला जात असला तरी तिची आणि तिच्या नृत्याची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. अनेकजन गौतमी पाटील चा लावणी महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करतात.
तिच्या डान्सवर अनेकजण जीव ओवाळून टाकतात. अशातच गौतमी पाटीलचा लावणी महोत्सव सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे आयोजित करण्यात आली आहे.
मंगळवेढा च्या देशसेवा ग्रुपच्या माध्यमातून लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा लावणी महोत्सव मंगळवेढा शहरातील यशवंत मैदान, इंग्लिश स्कुल, मंगळवेढा परिसरात होणार असल्याचे आयोजक आदित्य हिंदुस्तानी यांनी सांगितले.
गौतमी पाटील म्हटल्यावर तुफान गर्दी होणारच, तर सायंकाळी साडे सहा वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार असल्याचे समजते. त्यामुळे लावणी महोत्सवाला चांगलीच गर्दी होणार असल्याचे दिसते.
गौतमी पाटील ही आज सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे येणार आहे. देशसेवा ट्रस्ट व पीपल्स पॉवर ऑफ नेशन (एन .जी .ओ), अंबिका उद्योग समूह च्या वतीने गौतमी पाटीलचा लावणी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
त्यामुळे गौतमी पाटीलच्या डान्सवर अनेकजण जीव ओवाळून टाकतात त्यामुळे ५ जूनला मंगळवेढा मध्ये तोबा गर्दी होण्याची शक्यता आहे.


0 Comments