google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मा. बाबुराव गायकवाड यांच्या अमृतमहोत्सव सोहळ्याला जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित रहावे जि.प.अध्यक्षा जयमालाताई गायकवाड

Breaking News

मा. बाबुराव गायकवाड यांच्या अमृतमहोत्सव सोहळ्याला जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित रहावे जि.प.अध्यक्षा जयमालाताई गायकवाड

मा. बाबुराव गायकवाड यांच्या अमृतमहोत्सव सोहळ्याला

जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित रहावे जि.प.अध्यक्षा जयमालाताई गायकवाड

शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते सत्कार समांरभ

आम. शहाजीबापू पाटील व मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रयत्नातून सांगोला तालुक्यातील ३ मंदिरांच्या विकासासाठी ४ कोटी ४७ लाखांचा निधी मंजूर : जयमालाताई गायकवाड 

सांगोला :(प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)

सांगोला तालुक्यातील राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड यांच्या 

अमृत महोत्सवानिमित्त सत्कार समारंभ देशाचे नेते व माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहावे 

असे आवाहन जि.प.च्या माजी अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्याच्या उपाध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांनी केले आहे. बाबुराव गायकवाड यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘माझी वाटचाल’ या आत्मचरित्राचे 

आणि गौरव ग्रंथाचे प्रकाशन व सत्कार समारंभ देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या शुभहस्तेे व गौरव समितीचे स्वागत अध्यक्ष आमदार अ‍ॅड. शहाजीबापू पाटील, 

गौरव समितीचे अध्यक्ष मा.आ.दीपकआबा साळुंखे-पाटील तसेच गौरव समितीचे कार्याध्यक्ष प्रबुध्दचंद्र झपकेयांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक 8 मे रोजी सकाळी 10 वाजता रामकृष्ण व्हिला, 

वाढेगाव रोड येथे आयोजित केला असून या कार्यक्रमासाठी तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन जयमालाताई गायकवाड यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments