google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यातील लोकप्रतिनिधींना कॉमेडी करण्यासाठी विधानसभेत पाठवले का? नाना पटोले : सांगोल्यात घरेल कामगार महिला मेळावा

Breaking News

सांगोल्यातील लोकप्रतिनिधींना कॉमेडी करण्यासाठी विधानसभेत पाठवले का? नाना पटोले : सांगोल्यात घरेल कामगार महिला मेळावा

 सांगोल्यातील लोकप्रतिनिधींना कॉमेडी करण्यासाठी विधानसभेत पाठवले का?


नाना पटोले : सांगोल्यात घरेल कामगार महिला मेळावा

सांगोला : या भागातील लोकप्रतिनिधींनी तालुक्याच्या एकाही प्रश्नावर विधानसभेत कधी आवाज उठवला नाही. 

जनतेचे प्रश्न बाजूला सारून खोक्याच्या मागे धावणारे या भागाचा विकास कसा करू शकतील, असा लोकप्रतिनिधी आपण काय कॉमेडी करायला पाठवला होता का, असा सवाल प्रदेशाध्यक्ष काँग्रेस नाना पटोले यांनी केला.

सांगोला तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने महूद (ता. सांगोला) येथे रविवारी आयोजित घरेलू कामगार महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

 यावेळी प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार रामहरी रुपनवर, जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, काँग्रेसचे वरिष्ठ निरीक्षक विजयकुमार हत्तुरे, काकासाहेब कुलकर्णी, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष शाहीन शेख, 

मैनाताई बनसोडे, घरेलू महिला कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सुनीता अवघडे, शहराध्यक्ष तोहिद मल्ला, तालकाअध्यक्ष अभिषेक कांबळे, रवींद्र कांबळे, रणजित महापुरे आदी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले, महाराष्ट्रासह देशातील राजकारण गढूळ बनले आहे. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्रानुसार धनिकाकडून कर रूपाने जमा झालेला

 पैसा सर्वसामान्यांना सुविधा पुरवण्यासाठी वापरण्यात यावा. याच तत्त्वानुसार काँग्रेस पक्षाने गेल्या साठ वर्षांत धोरण राबवून सामान्य जनतेला न्याय व सुविधा दिल्या. स्वातंत्र्यानंतरच्या काळात सईपासून

सांगोल्यातच डाळिंब संशोधन केंद्र व्हावे

सांगोल्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी तसेच या भागातील डाळिंब उत्पादकांसाठी सांगोल्यातच डाळिंब संशोधन केंद्र व्हावे, यासाठी काँग्रेस पक्ष आग्रही राहील, असा ठाम विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी दिला.

रॉकेट बनविण्यापर्यंतची प्रगती साध्य केली. सध्या मात्र जीएसटीच्या रूपाने सर्वसामान्यांच्या अन्नधान्यावरही कर लावून अमाप पैसा गोळा केला जात आहे. हा पैसा ठराविक एक-दोन उद्योगपतींना देण्याचे पाप भाजप सरकार करते आहे.

 त्यामुळेच गेल्या आठ वर्षांपूर्वी जोउद्योगपती देशात खालच्या क्रमांकाव होते, ते सध्या जगात वरच्या क्रमांकाव गेल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी आमदार रामहरी रूपनवर, तालुकाध्यक्ष अभिषेक कांब यांनी मत व्यक्त केले. सूत्रसंचालन अभिजित कांबळे यांनी केले...

Post a Comment

0 Comments