google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महाराष्ट्र हादरला! प्रेयसीने केली भाजी चिरण्याच्या चाकूने प्रियकराची निर्घृण हत्या, कारण...

Breaking News

महाराष्ट्र हादरला! प्रेयसीने केली भाजी चिरण्याच्या चाकूने प्रियकराची निर्घृण हत्या, कारण...

 महाराष्ट्र हादरला! प्रेयसीने केली भाजी चिरण्याच्या चाकूने प्रियकराची निर्घृण हत्या, कारण...


वाघोलीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रेयसीकडून प्रियकराचा चाकूने वार करून खून केल्याची घटना समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

किरकोळ वादातून हे पाऊल उचलले असल्याची माहिती समोर येत आहे. यशवंत महेश मुंडे ( वय २०) असे खून झालेल्या प्रियकराचे नाव असून अनुजा महेश पणाळे असे खून केलेल्या प्रेयसीचे नाव आहे. 

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, प्रियकर आणि प्रेयसी दोघेही काही दिवसांपासून वाघोली परिसरात भाड्याच्या खोलीत रहात होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याने दोघेही एकत्र राहत होते. 

मात्र पहाटेच्या सुमारास प्रियकराचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळले. या घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी घटनीस्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

प्रथमदर्शनी प्रेयसीने घरात भाजी कापण्याच्या चाकूने प्रियकरावर वार केले. प्रियकराच्या सर्वांगावर वार केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. प्रियकराला रुग्णालयात हलवले मात्र उपाचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 

त्या दोघांच्या भांडणात प्रेयसीही जखमी झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. हा सगळा वाद नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप समोर आलेली नाही.

Post a Comment

0 Comments