google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी स्व.गणपतराव देशमुख परिवर्तन महविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली

Breaking News

सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी स्व.गणपतराव देशमुख परिवर्तन महविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली

सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी

स्व.गणपतराव देशमुख परिवर्तन महविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली 

पुन्हा लढू आणि पुन्हा जिंकून दाखवू

सांगोला/प्रतिनिधी(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क) :

आमच्याकडे तालुक्यातील एकही, ग्रामपंचायत, सोसायटी नसतानाही आम्ही मोठ्या ताकदीने निवडणुक लढवली. मतदारांनी अपेक्षेपेक्षा जास्त सहकार्य केले आहे. आमची सुरुवात ही शून्यातून झाली आहे

 त्यामुळे आमच्याकडे गमावण्यासाठी काहीच नव्हते. जे अस्तित्व आम्ही या निवडणुकीत दाखवले आहे तीच आमची कमाई आहे. आमच्याकडे पोलिंगसाठी प्रतिनिधी मिळाला नाही.

 तरी आम्ही निकराने झुंज दिली. प्रस्थापितांनी सामान्य जनतेला गृहीत धरल्यास आम्ही पुन्हा लढू आणि पुन्हा जिंकून दाखवू असा निर्धार माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सचिन देशमुख यांनी केला.

पुढे बोलताना डॉ. देशमुख म्हणाले, येणार्‍या निवडणूकीत आम्हाला गृहीत धरल्याशिवाय निवडणूका होणार नाहीत. आम्ही सर्वजण मिळून आगामी निवडणूका मोठ्या ताकदीने लढवणार आहोत.

 आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंखे-पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत देशमुख, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख,

 भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, काँग्रेसचे नेते प्रा. पीसी.झपके यांनी पुढील निवडणूका अशाच ताकदीने निवडणूका लढवाव्यात. 

नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिल्याने शेकापला आत्मचिंतननाची गरज असल्याचे मत शेकापचे माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी स्व.गणपतराव देशमुख परिवर्तन महविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. 

या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड, शेकापचे माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख, आरपीआयचे खंडू सातपुते, शिवसेनेचे (ठाकरे गट) गोरख येजगर, अक्षय रूपनर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड म्हणाले, निवडणुकीत आकड्यांच्या खेळात आमचा पराभव झाला असला तरी नैतिकतेच्या दृष्टीने आमचा विजय झाला आहे. 

आजी माजी आमदारांसह भावी आमदार म्हणवणार्‍या दिग्गज नेत्यांनी एकत्रित येत निवडणुक लढवली. मात्र, मतदारांनी आमच्या पॅनलला भरघोस मतदान केले आहे. 

त्यामुळे मतदारांच्या विश्‍वासाला तडा जाऊ न देता आम्ही यापुढे जनतेच्या न्याय हक्कासाठी परिवर्तनाची लढाई लढत राहू असा विश्‍वास बाबुराव गायकवाड यांनी दिला. यावेळी भारत मोरे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments