आमदार विक्रमदादा सावंत यांच्यावतीने सायकलिस्ट नीलकंठ शिंदे सर, राहुल पाटील यांचा सत्कार संपन्न.
सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क )
जतचे आमदार विक्रमदादा सावंत यांच्यावतीने सायकल विक्रमवीर नीलकंठ शिंदे सर व राहुल पाटील यांचा सत्कार मोठ्या उत्साही वातावरणात करण्यात आला .
नीलकंठ शिंदे सर यांनी उत्तर व दक्षिण भारत सायकल परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल आमदार विक्रम दादा सावंत यांच्या वतीने शाल, श्रीफळ, बुफे देऊन नुकतेच गौरवण्यात आले .यावेळी आमदार सावंत सरांनी संपूर्ण भारत सायकल यात्रेची अनुभव व माहिती शिंदे सरांकडून जाणून घेतली .
यावेळी आमदार सावंत यांनी सदरचा हा प्रवास थक्क करणारा असल्याचे आवर्जून सांगितले यापुढील काळात देखील अधिकाधिक सायकलिंग करून निरोगी राहून निसर्ग संवर्धन करण्याचे आव्हान केले .
यावेळी जतचे सायकलिस्ट पत्रकार अनिल मदने सर, माजी उपसभापती बाबासाहेब कोडग यांचेसह अनेक मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
सदरचा सत्कार स्वीकारण्यासाठी विशेषतः निळकंठ शिंदे सर व राहुल पाटील हे सांगोल्यातून सायकलिंग करत जत पोहोचले त्यामुळे आमदार साहेबांनी विशेष सत्कार करून पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
0 Comments