सांगोला तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी
दाखल १३६ पैकी १२७ अर्ज वैध ठरले
सांगोला कृषी उत्पन्न समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी तापू लागली आहे. बाजार समितीसाठी विक्रमी १३६ अर्ज दाखल झाल्यानंतर या अर्जांची सहायक निबंधक कार्यालयांमध्ये छाननी करण्यात आली.
यात एक अर्ज नामंजूर, आठ अर्ज अवैध तर १२७ जणांचे अर्ज वैध झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद दुरगुडे यांनी दिली. उमेदवारी माघारीनंतरच किती उमेदवार मैदानात राहणार हे निश्चित होणार आहे.
सांगोला तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखल १३६ पैकी १२७ अर्ज वैध ठरले आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रमोद दुरगुडेकाम पहात आहेत. सांगोला तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखल अर्जांची छाणणी झाली.
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात झालेल्या छाननीत दाखल १३६ पैकी १२७ अर्ज वैध ठरले. तर एका उमेदवाराचा अर्ज नामंजूर तर आठ
अर्ज अवैध ठरल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दूरगुडे यांनी जाहीर केले. सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ संचालकाची निवड २ हजार १८३ मतदार करणार आहेत.
सहकारी संस्था मतदारसंघात ११ बाजार जागा असून सर्वसाधारण गटातून ७ जागेसाठी ५५ अर्ज, महिलागटातून २ जागेसाठी ९ अर्ज, इतर मागासवर्गीय गटातून
एका जागेसाठी ५ अर्ज, इतर विमुक्त जाती भटक्या माती गटातून एका जागेसाठी १० अर्ज, ग्रामपंचायत मतदारसंघात ४ जागा असून सर्वसाधारण गटातून २ जागेसाठी २७ अर्ज, अनुसूचित जाती जमाती गटातून एका जागेसाठी ६ अर्ज, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक गटातून एका
जागेसाठी २, व्यापारी मतदारसंघात दोन जागेसाठी १० अर्ज तर हमाल व तोलार मतदारसंघात एका जागेसाठी ३ अर्ज असे १८ जागेसाठी १२७ अर्ज वैध झाल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी प्रमोद दुरगुडे यांनी दिली


0 Comments