google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात चक्क हनुमानाची मूर्तीच चोरून नेल्याची महूद येथील घटना

Breaking News

सांगोला तालुक्यात चक्क हनुमानाची मूर्तीच चोरून नेल्याची महूद येथील घटना

सांगोला तालुक्यात चक्क हनुमानाची मूर्तीच चोरून नेल्याची महूद येथील घटना 

महुद :-आजपर्यंत मंदिरातील दागिन्यांच्या चोरीच्या घटना घडल्या आहेत; मात्र महूद परिसरात वारंवार चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांचे मनोबल इतके वाढले, 

की त्यांनी चक्क हनुमानाची मूर्तीच चोरून नेल्याची घटना महूद अंतर्गत असलेल्या ढाळेवाडी चौकी येथे घडली आहे. महूद- सांगोला रस्त्यालगत ढाळेवाडी चौकी येथे हनुमानाचे छोटे मंदिर आहे. 

नीरा उजवा कालव्याचे काम सुरु असताना त्यावेळी ढाळेवाडी चौकी या ठिकाणी कट्टा बांधून त्यावर मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्यानंतर ढाळेवाडी येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊनछोटे मंदिर बांधले. या हनुमान मंदिरात नित्य पूजाअर्चा होत होती. 

कालव्या शेजारी असलेल्या मोठ्या झाडांची सावली मंदिर परिसरात पडते. त्यामुळे या मंदिराच्या कट्ट्यावर नेहमी लोकांची ऊठबस असते. हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 परिसरातील भाविकांनी एकत्र येऊन महाप्रसादाचे वाटपही केले होते. सकाळी भाविक दर्शनाला गेले असता मंदिरात मूर्तीच नसल्याचे निदर्शनास आले.

 मूर्ती चोरीला गेल्याचे समजतात या ठिकाणी भाविकांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली. कल्याण लुबाळ यांनी हनुमानाची मूर्ती चोरीला गेल्याची माहिती

 पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांना दिली. सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र राजुलवार यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी भेट देऊन मंदिराची पाहणी केली. 

यावेळी भाविकांनी अज्ञात व्यक्तीने सामाजिक तेढ निर्माण व्हावी, या हेतूने मूर्ती चोरली असून, संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन तपास करावा, अशी मागणी केली.

दरम्यान, पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने या ठिकाणी नवीन हनुमानाची मूर्ती आणण्यात आली. या नव्यानवीन हनुमानाची मूर्ती आणण्यात आली. या नव्यामूर्तीची प्राणप्रतिष्ठापना लगेच करून घडल्या प्रकाराची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

मात्र महूद परिसरामध्ये आठवडा बाजारसह दिवसाढवळ्या अनेक मोठ्या चोऱ्यांचे प्रकार घडले आहेत. आता तर चक्क देवाची मूर्तीच चोरून नेण्याचे धाडस चोरांचे झाले आहे. एकूणच, परिसरात पोलिस प्रशासनाचा कसलाही धाक राहिला नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments