google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, रमजान ईद व महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवानिमित्त शांतता समितीची बैठक संपन्न

Breaking News

सांगोला तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, रमजान ईद व महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवानिमित्त शांतता समितीची बैठक संपन्न

सांगोला तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव,

रमजान ईद व महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवानिमित्त शांतता समितीची बैठक संपन्न 

 सोशल मीडियातून धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार; शिरीष सरदेशपांडे

सांगोला : सांगोला तालुक्याला धार्मिक सलोखा नेहमीच चांगला आहे. यापुढेही सर्व सण, जयंती उत्सव असेच शांततेने व एकोप्याने साजरी करावेत. आजकाल मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. 

सोशल मीडियाद्वारे धार्मिक भावना दुखावणारे मेसेज करून समाजाची शांतता बिघडवण्याचे काम कोण करत असेल तर त्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिला.

आगामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, रमजान ईद व महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवानिमित्त शांतता समितीची बैठक पंचायत समितीच्या बचत भवनमध्ये आयोजित करण्यात आली होती. 

यावेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार शहाजी पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील,

 पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, तहसीलदार अभिजित पाटील, गटविकास अधिकारी आनंद लोकरे, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे,मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी, महावितरणचे उपअभियंता आनंद पवार, 

भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, बाबुराव गायकवाड, तानाजी पाटील, शब्बीरभाई खतीब, खंडू सातपुते, दादासाहेब लवटे, दीपक खटकाळे, कमरूद्दिन खतीब, तानाजी बनसोडे, 

सुरज बनसोडे यांच्यासह जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार शहाजी पाटील म्हणाले, सांगोला तालुका शांतताप्रिय आहे. 

सर्वच सण गुण्यागोविंदाने साजरे होतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाच्या कामाचे लवकरच भूमिपूजन करण्यात येणार आहे.

 यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह बाबुराव गायकवाड ,हाजी शब्बीरभाई खतीब, सुरज बनसोडे, खंडू सातपुते, प्रभाकर कसबे, बाबासाहेब बनसोडे, बापुसाहेब ठोकळे,

 मनोज उकळे यांनी मनोगत व्यक्त करून आपल्या सूचना सांगितल्या. प्रस्ताविक सांगोल्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी केले. पोलीस उपनिरीक्षक नागेश यमगर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Post a Comment

0 Comments