सांगोला तालुक्यातील कोळा येथील पोक्सो प्रकरणातील अटक आरोपी शिक्षकास अखेर जामीन मंजूर
कोळा येथील नामांकित शिक्षण संस्थेत स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमात विद्यार्थीनीशी छेडछाडीचा प्रकार घडला होता.
या प्रकरणी १६ जानेवारी २०२३ रोजी मुख्याध्यापकांनी सांगोला पोलिस स्टेशनला फिर्याद दिली होती.
मुख्याध्यापकांनी दिलेल्या फिर्यादीवरून सांगोला पोलिसांनी शिक्षक असणारा संशयित आरोपी शत्रुघ्न भांगरे यांस अटक केली होती.त्यानंतर सदर आरोपीने पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.
यामध्ये पंढरपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मा.तोष्णीवाल साहेब यांनी आरोपींचे वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन संशयित आरोपी शत्रुघ्न भांगरे यांस
दि.०७ एप्रिल रोजी २०२३ रोजी जामीन मंजूर केला.यात आरोपीतर्फे ॲड.दिपक मदने व ॲड.विजय बेंदगुडे यांनी तर सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड.सारंग वांगीकर यांनी काम पाहिले.
0 Comments