Breaking News

सांगोला शहरात चोरट्याने तीन शेतकऱ्यांच्या १३ शेळ्या चोरीला गेल्या..

 सांगोला शहरात चोरट्याने तीन शेतकऱ्यांच्या १३ शेळ्या चोरीला गेल्या..

सांगोला : सांगोला शहरातील बनकर मळ्यातील तीन शेतकऱ्यांची अंदाजे १९ हजार रुपये किमतीचे १३ शेळ्या, 

बोकडे, पाट, अशी जनावरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवार रात्रीच्या सुमारास पडल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत नंदकुमार शंकर बनसोडे याने सांगोला पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. रविवारी रात्री झोपताना तारेचे कंपाउंड चे गेट बंद करून झोपी गेलो सकाळी उठून कंपाउंड मध्ये पाहिले असता बारा शेळया पैकी तीन मोठ्या शेळ्या

 अंदाजे किंमत अठराहजार रुपये, चार मोठी बोकडे अंदाजे प्रत्येकी पाच हजार रुपये किमतीचे वीस हजार रुपये व दोन पाट प्रत्येकी पाच हजार रुपये किमतीचे दहा हजार रुपयाचे एकूण ४८ हजार रुपये किमतीचे नऊ शेळी बोकडे व पाट चोरीस गेले 

तसेच शेजारी चौकशी केली असता सचिन सुभाष बनकर यांचे १५००० रुपये किमतीचे तीन पाट, व गणेश खंडू बनकर यांचे सहा हजार रुपये किमतीची एक शेळी असे

 एकवीस हजार रुपये किमतीचे चार शेळी व पाट चोरीला गेल्याची फिर्याद सांगोला पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली असून पुढील तपास सांगोला पोलीस करीत आहे

Post a Comment

0 Comments