सांगोला नगरपालिकेने मीटर नळ कनेक्शनची सक्ती रद्द करावी :-अशोक कामटे संघटना
सांगोला (प्रतिनिधी)अनेक वर्षांपासून सांगोला नगरपालिका नागरिकांना सर्वत्र मीटर कनेक्शनची सक्ती करीत आहेत सदरचे जाचक बंधन रद्द करावे या मागणीकरता शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
सांगोला नगरपरिषदेने शहरातील सर्व नागरिकांना मीटर कनेक्शन सक्तीचे केले आहे हे पूर्णतः अन्यायकारक असून जिल्ह्यातील इतर नगरपालिकांनी याची सक्ती केली नसून केवळ सांगोला नगरपालिका याला अपवाद आहे.
त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक शोषण होत आहे, नाईलाजस्तव अनेकांना याचा त्रास होत आहे या विभागाचे संबंधित अधिकारी कर्मचारी समस्येकडे दुर्लक्ष करीत आहेत त्याचबरोबर घरगुती व व्यावसायिक नळ धारकांना डबल भुर्दंड भरावा लागत आहे.
शहरवासीयांना पाण्याचा वापर मर्यादित असताना चुकीच्या बीले दिलेले आहेत ,तरी सदरचा निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणे नागरिकांना आवश्यकतेप्रमाणे नळ जोडणी मिळावी याची दखल न घेतल्यास नगरपालिके विरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येईल तरी नगरपालिकेने नागरिकांना सुधारित नळ जोडणी देणे कामी निर्णय ,कार्यवाही ,अंमलबजावणी तात्काळ करावी.या निवेदनाच्या प्रती मा राधाकृष्ण विखे -पाटील (पालकमंत्री सोलापूर जिल्हा) ,जिल्हाधिकारी,आमदार ॲड .शहाजीबापू पाटील
तहसीलदार,सांगोला यांनाही देण्यात आले आहेत तसेच सांगोला शहरातील नळ धारकांनी या प्रकारच्या समस्या असतील
तर त्यांनी बिलाच्या पावत्याची झेरॉक्स ,संक्षिप्त माहिती स्टेशन रोड येथील संघटनेच्या कार्यालयात जमा करावी असे आव्हान शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.


0 Comments