Breaking News

बिग ब्रेकिंग! रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी

 बिग ब्रेकिंग! रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी

देशातील रेशनकार्ड धारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. याबाबत केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. 

आता तुम्हाला रेशन सोबतच केंद्र व राज्य सरकारकडून विशेष सुविधा मिळणार आहेत. करोडो कार्डधारकांना याचा मोठा फायदा होणार आहे. केंद्र सरकारने अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या मोठी सुविधा सुरू केली आहे. 

सर्व अंत्योदय कार्डधारकांच्या मोफत उपचारासाठी आयुष्यमान कार्ड बनवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. यासाठी जिल्हा व तहसील स्तरावर विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. 

या अभियानांतर्गत अंतर्गत अंत्योदय कार्डधारक कुटुंबातील सर्वच सदस्यांचे आयुष्यमान कार्ड बनवण्याचे उद्दिष्ट सरकारचे आहे. सध्या अंत्योदय कार्डधारकांकडे आयुष्यमान कार्ड उपलब्ध नाही. 

या नव्या योजनेनुसार अंतर्गत कार्डधारकांना आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या निर्माण झाल्यास उपचारासाठी बाहेर जावे लागणार नाही, अशी सरकारची योजना आहे. यासाठी शासन स्तरावरून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. 

यातील पात्र लाभार्थी आयुष्यमान कार्ड मिळाल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र, जनसेवा केंद्र तसेच आयुष्यमान पॅनल्सी जोडलेले खाजगी रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात अंतोदय रेशनकार्ड दाखवून कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी आयुष्यमान कार्ड बनवता येणे शक्य होणार आहे.

Post a Comment

0 Comments