Breaking News

सांगोला तालुक्यातील जुनोनी ते बेवनूर रोडवर खड्डेच खड्डे रस्त्याची दुरवस्था..? प्रशासनाने लक्ष देऊन डांबरीकरण करणे गरजेचे आहे...

सांगोला तालुक्यातील जुनोनी ते बेवनूर रोडवर खड्डेच खड्डे

रस्त्याची दुरवस्था..? प्रशासनाने लक्ष देऊन डांबरीकरण करणे गरजेचे आहे...

कोळा / वार्ताहर:सांगोला तालुक्यातील राज्यमहामार्गावरील सोलापुर जिल्हाचे शेवटचे मोठे गाव म्हणुन जुनोनी गावाची ओळख आहे, या गावातुन जुनोनी ते बेवनुर रस्त्याची अवस्था इतकी वाईट झाली आहे की रोडवर खडी व मोठमोठे दगड मुरूम डांबरी पूर्णपणे उचकटून गेली आहे

 टोळे वर आल्याने मोटरसायकलचे अनेक अपघात झाले असून वाहधारकांना त्रास होत आहे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देऊन रस्त्याचे लवकरात लवकर डांबरीकरणकरून वाहनधारकांना दिलासा द्यावा अशी मागणी जुनोनी गावचे सेवानिवृत्त प्राचार्य वसंतराव मोहिते सर यांनी केली आहे.

पुढे बोलताना माजी प्राचार्य वसंतराव मोहिते म्हणाले जुनोनी बेवनूर महत्त्वाचा रस्ता आहे जत विजापूर कर्नाटककडे जाण्यासाठी जवळचा मार्ग असून या रोडवर डाकामळा पवार वस्ती मोहिते वस्ती संतराम पाटील शामराव रहनमाने घर या रोडवर दिवसभरात भरपूर वर्दळ असते धुळीचे प्रमाण वाढले आहे अनेक मोटरसायकलचे अपघात झाले

 असून अनेक लोक पडून जखमीजुनोनी ते डाकामळा मोहिते वस्तीपर्यंत पर्यंत रस्त्याची खूप मोठी दुरावस्था झाली आहे दगड माती मुरूम मोठमोठे दगडाचे टोळे वर आले आहेत अनेक अपघात ठिकाणी घडले असून जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देऊन रस्त्याचे काटेरी झुडपे काढून डांबरीकरण करणे गरजेचे आहे....

मा श्री वसंतराव मोहिते, मा प्राचार्य जुनोनी

जुनोनी बेवनूर रोडची अवस्था खूप खराब असून रोज प्रवास करून खड्डे तुन कसरत करत मोटरसायकल चालवावी लागत आहे अनेकांना कमरेचा त्रास सुरू झाला असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे संबंधित प्रशासनाने लक्ष द्यावे

अण्णासाहेब सरगर, स्वराज मेन्स वेअर जुनोनी

झाले आहेत बेवनूर रोड कडे जिल्हा परिषद बांधकाम विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे रोडची दयनीय अवस्था झाली 

असुन रस्ताच्या दोन्ही बाजुला बाभळीच्या चिलारच्या झाडाचे साम्राज्य निर्माण झाले आहे रस्त्याचे चांगले डांबरीकरण व रोडवरील धान बाभळीचे झुडपे तसेच अरुंद रस्ता मोठा करणे गरजेचे आहे. जुनोनी गावाची लोकसंख्खा साधारणपणे सात हजाराच्या आसपास आहे, 

जुनोनी गावात कपड्याचे किराणा मालाचे दुकाने व मोठ्या बाजारपेठेचे गाव असल्यामुळे आठवडा बाजारहीमोठा सोमवारी भरत असतो यामुळे नागरीकांचा जुनोनी गावाकडे ओढा जास्त असतो. या मार्गावर दिवसभर जत आटपाडी जत कोळा अनेक एसटी बसेस तसेच ट्रक, टेम्पो, 

वडापचे टमटम, मोटारसायकली यांची दिवसभर ये जा सुरु असते संबंधीत विभागाकडुन रोड कडे दुर्लक्ष केले जात आहे. लवकरात लवकर चांगल्या दर्जाचे डांबरीकरण जिल्हा परिषद बांधकाम विभागाने लक्ष नाही दिले तर आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी प्राचार्य वसंतराव मोहिते सर यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments