बच्चू कडूंना सर्वात मोठा धक्का, न्यायालयाने सुनावली दोन वर्षांची शिक्षा; काय आहे प्रकरण?
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सरकारी अधिकाऱ्याला मारहाण करणे कडू यांना चांगलेच भोवले आहे.
नाशिक महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर आमदार बच्चू कडू यांनी हात उगारला होता. या प्रकरणात बच्चू कडू यांना नाशिक जिल्ह्या कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
२०१७ मध्ये बच्चू कडू यांनी दिव्यांगांच्या मागण्यांसाठी आंदोलन केले होते. महापालिकेत हे आंदोलन केलं होतं. या आंदोलनावेळी बच्चू कडू यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर हात उगारला होता. त्यामुळे बच्चू कडू यांच्याविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयाकडून शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर बच्चू कडू यांना आता उच्च न्यायालयात दाद मागावी लागणार आहे. आज किंवा उद्याच बच्चू कडू यांच्या वकिलामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाण्याची शक्यता आहे.
0 Comments