google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक.. पंढरपूरच्या गटशिक्षण विभागात घुसून मुख्याध्यापकाची कर्मचाऱ्याला बेदम मारहाण.

Breaking News

धक्कादायक.. पंढरपूरच्या गटशिक्षण विभागात घुसून मुख्याध्यापकाची कर्मचाऱ्याला बेदम मारहाण.

धक्कादायक.. पंढरपूरच्या गटशिक्षण विभागात घुसून मुख्याध्यापकाची कर्मचाऱ्याला बेदम मारहाण.

मुख्याध्यापक दारूच्या नशेत असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप

पंढरपूर :- पंढरपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गटशिक्षण विभागामधील संजय माधव बरमदे या कंत्राटी कर्मचाऱ्याला कार्यालयात घुसून भटुंबरे गावातील जिल्हा परिषद शाळेचे

 मुख्याध्यापक ज्योतीराम रोकडे यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ आणि बेदम मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. याप्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात मुख्याध्यापका विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कंत्राटी कर्मचारी संजय बरमदे हे आपल्या कार्यालयामध्ये काम करीत बसले होते. याच दरम्यान मुख्याध्यापक ज्योतीराम रोकडे त्या ठिकाणी आले. त्यांनी बरमदे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

 बर मध्ये यांनी या शिवीगाळ करण्याचा जाब विचारला असता त्यांना कार्यालयाच्या बाहेर काढून लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप बरमदे यांनी केला आहे. तसेच हे मुख्याध्यापक दारूच्या नशेत असल्याचा आरोप देखील कंत्राटी कर्मचारी संघटनेने केला आहे.

या मारहाणीत बरमदे हे जखमी झाले आहेत. बरमदे यांनी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पंढरपूर शहर पोलीस ठाणे करत आहेत.

दारुड्या मुख्याध्यापकावर कारवाई न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा डॉ.शगुप्ता तांबोळी यांनी दिला आहे.

तुटपुंजा मानधनावर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दारूच्या नशेत बेदम मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला जात असेल तर ही बाब निषेधार्य आहे. आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्याला योग्य न्याय मिळाला पाहिजे. अन्यथा सोमवारपासून बेमुदत काम बंद करणार असल्याचे तांबोळी यांनी जाहीर केले आहे.

Post a Comment

0 Comments