google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक विकृतीचं टोक! अल्पवयीन तरुणीवर बलात्कार, मित्रांनाही एक चान्स दे असं सांगितलं, अखेर मुलीनं उचललं टोकाचं पाऊल आटपाडी तालुक्यातील घटना..

Breaking News

धक्कादायक विकृतीचं टोक! अल्पवयीन तरुणीवर बलात्कार, मित्रांनाही एक चान्स दे असं सांगितलं, अखेर मुलीनं उचललं टोकाचं पाऊल आटपाडी तालुक्यातील घटना..

धक्कादायक विकृतीचं टोक! अल्पवयीन तरुणीवर बलात्कार, मित्रांनाही एक



चान्स दे असं सांगितलं, अखेर मुलीनं उचललं टोकाचं पाऊल आटपाडी तालुक्यातील घटना..

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी गावात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. गावातील कन्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर गावातीलच एका तरुणाने बलात्कार केला आहे.

त्यानंतर संबंधित तरुणाने पीडितेचे अश्लील व्हिडिओ शूट केले आण व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी दिली. एवढंच नाही,तर हे प्रकरण कोणाला सांगितल्यास तुझ्या वडिलांना जीवे मारण्याची उघड धमकी दिली.

 तो तरुण इथवरच न थांबला त्याने माझ्या मित्रांसोबतही संबंध ठेव असं सांगितलं होते. या त्रासाला कंटाळून त्या अल्पवयीन मुलीने राहत्या घरातच गळफास घेत आत्महत्या केली आहे.

आमदार निवास कॅन्टीनमध्ये शिंदे गटाच्या आमदाराने घातला राडा, कॅन्टीन व्यवस्थापकाला केली मारहाण

या संवेदनशील घटनेची तक्रार पोलिसांनी नोंदवली नाही. रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदवला जात नाही तोवर मृतदेह ताब्यात घेतला 

जाणार नसल्याचं ग्रामस्थ म्हणाले. अखेर ग्रामस्थांनी गुन्हा दाखल करण्याबाबतच्या मागणीने जोर धरला. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

 अल्पवयीन मुलीवर बलात्कार होऊनही नराधाम्यांवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला नव्हता. ग्रामस्थांनीच एकूण चारपैकी दोन आरोपींना ताब्यात घेतलं. त्यापैकी इतर दोघेजण फरार असल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित तरुण हा गुन्हेगारी पाश्वभूमीचा असल्याची माहिती वृत्तमाध्यमांनी दिली आहे. तसेच त्यांच्या मागे कोणीतरी राजकीय वरदहस्त असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

ग्रामस्थांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याने ग्रामस्थ पोलिसांवर चांगलेच संतापले आहेत. दरम्यान, याच प्रकरणात अल्पवयीन तरुणीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

आत्महत्या केलेली पीडित अल्पवयीन मुलगी एक चांगली क्रिडापटू होती. तिचे इंडियन आर्मित जाण्याचे स्वप्न होते. 

मात्र, तिच्यासोबत जे काही घडलं आहे, त्यामुळे होत्याचं नव्हतं झालं आहे. तसेच तिच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आणि या घटनेनं आता सांगली हादरून गेली आहे. 

शहरीभागाप्रमाणेच आता ग्रामीण भागातही अशाच घटना घडताना दिसत आहे. त्यातच अशा घटनांची दखल पोलीस प्रशासन घेत नसल्याचं हे प्रकरण उत्तम उदाहरण ठरत आहे.

Post a Comment

0 Comments