सांगोला पोलीसांची विशेष कामगिरी सांगोला तालुक्यातील सराईत गुन्हे, वाळु तस्कर'
सचिन आनंदा केदार राहणार वासुद ता. सांगोला यास केले स्थानबध्द
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
दिनांक २७/०६/२०२५ रोजी मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, सोलापुर याचे आदेशान्वये सचिन आनंदा केदार वय २७ वर्षे राहणार वासुद तालुका सांगोला
जिल्हा सोलापुर यास महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृक्श्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती (व्हिडीओ पायरेटस),
वाळू तरकर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणा-या व्यक्ती यांच्याविघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम सन १९८१ कलम ३ (१) अन्वये स्थानबध्द करण्याचे आदेश निर्गमित केले होते.
प्राप्त आदेशाप्रमाणे एम.पी.डी.ए. कायद्यातील तरतुदी नुसार स्थानबध्द सचिन आनंदा केदार वय २७वर्षे राहणार वासुद तालुका सांगोला जिल्हा सोलापुर याचा दि.२७/०६/२०२५ रोजी सांगोला पोलीस ठाणेकडील पोलीस पथकाने राहते घरी वासुद ता. सांगोला येथे शोध घेतला असता तो मिळुन
आल्याने सचिन आनंदा केदार वय २७ वर्षे राहणार वासुद तालुका सांगोला यास सांगोला पोलीस ठाणेस हजर केले मा. जिल्हादंडाधिकारी सोलापूर यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार स्थानबध्दतेची स्थानबध्द कारणे सांगून कायद्यातील
तरतूदीनुसार दिनांक २७/०६/२०२५ रोजी आदेशाची बजावणी करुन सचिन आनंदा केदार यास सांगोला पोलीस ठाणे कडील ०१ पोलीस अधिकारी व आरोपी पार्टीसह शासकीय वाहनातुन दिनांक २८/०६/२०२५ रोजी मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे येथे दाखल केले आहे.
सदरची कामगिरी मा. श्री अतुल कुलकर्णी सो, पोलीस अधिक्षक, सोलापुर ग्रामीण, मा. मा.श्री. प्रितम यावलकर सो, अप्पर पोलीस अधिक्षक, सोलापुर ग्रामीण मा. श्री विक्रांत गायकवाड सो, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे
मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद घुगे सो, सांगोला पोलीस ठाणे. सपोफौ कल्याण ढवणे, पोहेकों अनिस शेख (स्थानिक गुन्हे शाखा) पोकों गणेश कुलकर्णी, पोकों राजु आवटे, यांनी सदरच्या प्रतास्वाचे कामकाज पाहिले आहे.
0 Comments