Breaking News

पिलीव येते घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सब ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेमध्ये सांगोला तालुक्याला घवघवीत यश

 पिलीव येते घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सब ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेमध्ये सांगोला तालुक्याला घवघवीत यश  

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)

सांगोला प्रतिनिधी / समाधान मोरे 

दि. 12 मार्च 2023 रोजी पिलीव (माळशिरस) येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सब ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत सांगोला तालुक्याचे 14 सुवर्ण पदक प्राप्त झाले. यामध्ये सांगोला , शिवणे , महूद , धायटी गावातील खेळाडू सहभागी झाले होते.

 त्यामध्ये समर्थ महाजन (16 ते 18 किलो), सार्थक भुसे (18 ते 21 किलो), सुमित कदम (21 ते 23 किलो), राजवर्धन सूर्यवंशी (23 ते 25 किलो), श्रेयस कोळेकर (25 ते 27 किलो), श्री गायकवाड (27 ते 29 किलो), असद मुल्ला (29 ते 32 किलो), अनिस मुलाणी (35 ते 38 किलो), मलिक पठाण ),(38 ते 41 किलो)

 मुली :- जोया मुलाणी (22 ते 24 किलो), राजश्री कदम (26 ते 29 किलो), माहेश्र्वरी  मेटकरी (29 ते 32 किलो), साक्षी भोसले (32 ते 35 किलो), शोभा ठोंबरे (38 ते 41 किलो) . या सर्व विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून या सर्व विद्यार्थ्यांची दी 16मार्च रोजी  रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये निवड झाली आहे.

 तसेच वेगवेगळ्या ठिकाणी राज्यस्तरीय असो जिल्हास्तरीय असो अशा सर्व स्पर्धेमध्ये हे विद्यार्थी सहभागी होऊन यश मिळवताना दिसत आहेत. आणि त्यांना या यशाचे फळ म्हणून मिळेल व काही पदके ही मिळालेली आहेत. 

आणि यांच्या या मिळालेल्या यशासाठी वारंवार त्यांना कौतुकाची थाप देऊन पुढील यशासाठी सहकार्य व मुख्य प्रक्षिशक म्हणून उत्कृष्ट पद्धतीचे शिक्षण देणारे प्रशिक्षक आबासो वाघमोडे , प्रक्षिशक प्रसाद घाडगे , प्रक्षिशक राज माळी , प्रक्षिशक अजय गुसाळे, प्रक्षिशक बाळकृष्ण बंडगर यांचे मागदर्शन लाभले.

 आणि अशा या प्रशिक्षकांमुळे आमच्या खेडेगावांन मध्ये येऊन मुलांना प्रशिक्षण देणे व  जिल्हास्तरीय राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन मेडल व पदक मिळवणे ही साधी गोष्ट नसून प्रशिक्षकांनी शिकवण्यासाठी घेतलेले कष्ट आणि त्या कष्टाचे फळ म्हणजेच ही मिळालेली मेडल व पदके आहेत

 इथून पुढच्या काळात ही असेच भरभरून यश मिळत राहो आशा शुभेच्छा खंडू भोसले यांच्या वतीने सर्व प्रशिक्षक व विद्यार्थी यांना देण्यात आल्या तसेच तालुकास्तरातूनही  ग्रामस्थांकडून सर्वत्र कौतुक करून पुढील यशासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments