सांगोला जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावी या मागणीसाठी बेमुदत संप
व सांगोला तहसील कार्यालयावर डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत भव्य मोर्चा
जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावी..या मागणीसाठी सांगोला तालुक्यातील सर्व राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत
संपावर गेले आहेत
सदर संपाला शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व इतरही काही पक्ष व संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे... शेतकरी कामगार पक्षाचे नेते व पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रीय काँग्रेसचे नेते प्रा.पी.सी.झपके तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मा तानाजी(काका) पाटील यांच्या उपस्थितीत हजारो कर्मचारऱ्यांनी सांगोला तहसील कार्यालयात भव्य मोर्चा काढण्यात आला...
सदर मोर्चा मध्ये ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी, ग्रामसेवक,शिक्षक,पंचायत समितीमधील कर्मचारी व इतरही राज्य सरकारी कर्मचारी सहभागी झाले होते




0 Comments