सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक शेकाप स्वबळावर लढणार
शेतकरी सहकारी सूतगिरणी व खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत ज्या जि. प. गटाला संचालक मंडळात स्थान मिळाले नाही, अशा जवळा व घेरडी गटातील इच्छुकांना कृषी उत्पन्न बाजार
समितीच्या निवडणुकीत प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिताचा निवडणूक शेतकरी कामगार पक्ष स्वबळावर लढवणार असल्याचे शेकापचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत देशमुख यांनी सांगितले.
सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली आहे. त्या अनुषंगाने सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते,
इच्छुकांची बैठक डॉ. भाई गणपतराव देशमुख शेतकरीसूत गिरणीच्या मंडळाचे सदस्य बाबा करांडे, तालुका चिटणीस दादासाहेब बाबर, शहर चिटणीस भारत बनकर,
उद्योगपती बाळासाहेब एरंडे, माजी नगराध्यक्ष मारुती बनकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख, संगम धांडोरे, किसन माने, गजेंद्र कोळेकर, मारुती ढाळे, विजय खरात, माजी सभापती गिरीश गंगथडे.
बाळासाहेब काटकर, नारायण पाटील, सीताराम सरगर, बाळासाहेब पाटील, अंकुश येडगे, सुनील चौगुले, लक्ष्मण माळी, संतोष देवकाते, नंदू शिंदे, विनायक कुलकर्णी, पिंटू पुकळे, दीपक रूपनर, संतोष सराटे, उध्दव खांडेकर, नंदू यादव, मायाप्पा यमगर, नितीन जरे आदी उपस्थित होते.


0 Comments