google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला नगरपालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष, उपाययोजना कराव्यात :-शहीद अशोक कामटे संघटना मच्छर जोरात, नगरपालिका कोमात

Breaking News

सांगोला नगरपालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष, उपाययोजना कराव्यात :-शहीद अशोक कामटे संघटना मच्छर जोरात, नगरपालिका कोमात

 सांगोला नगरपालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष, उपाययोजना कराव्यात :-

शहीद अशोक कामटे संघटना मच्छर जोरात, नगरपालिका कोमात

सांगोला (प्रतिनिधी)(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)

सांगोला शहर व परिसरात डासांचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे . त्याकरिता उपाय योजना कराव्यात अशी मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने केली आहे.

सांगोला शहरातील सर्वच चौफेर भागात मच्छरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गेल्या 2-3 महिन्यांपासून नगरपरिषदेच्या वतीने फवारणी ,धुराळणी,  शहरात कुठल्याही भागात केली नसून त्यामुळे डासांचे पैदास व प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

 काटेरी झुडपे व अस्वच्छता यामुळे परिणामी डेंगू ,मलेरिया यासारखे आजार  उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोके वर काढल्याने चिंता वाढली आहे.

 त्यातच मच्छरांचे प्रमाण वाढल्याने नगरपालिका याबाबत कोणतीच कार्यवाही करताना दिसून येत नाही. यामुळेच शहरातील अनेक नागरिक आजारी असून नगरपालिकेने यावर तात्काळ प्रतिबंधात्मक उपाय करावेत अशी अनेक नागरिकांनी अशोक कामटे संघटनेकडे मागणी केली आहे.

नगरपालिका केवळ कर वसुली करण्यात मग्न व अग्रस्थानी आहे. नागरी सुविधा पुरवण्यात पूर्णपणे  अकार्यक्षम आहे.

हे सर्व होत असताना नगरपालिका प्रशासन शहरातील नागरिकांच्या आरोग्य समस्या प्रश्न याकरिता तात्काळ उपाययोजना करताना दिसून येत नाही. याबाबत शहरातील व्यापारी ,रहिवाशी नागरिक यांना दैनंदिन प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे .

संबंधित नगरपालिका प्रशासनाने आठवड्यातून किमान दोन वेळा फवारणी, धुराळणी, स्वच्छता करून मच्छरांवर उपाययोजना करावेत अशी मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments