विधी सेवा समिती व विधीज्ञ संघ सांगोला यांचे संयुक्त
विदयमाने बचत भवन येथे महिलांबाबत कायदेविषयक शिबीर संपन्न
सांगोला (प्रतिनिधी): जागतिक महिला दिनाचे निमित्ताने विधी सेवा समिती सांगोला व विधिज्ञ संघ सांगोला यांचे संयुक्त विदयमाने मा. न्यायीक अधिकारी व विधीज्ञ यांचे उपस्थितीत
महिलांबाबत कायदेविषयक शिबीर मोठया उत्साहात संपन्न झाले. महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापुर यांचे निर्देशाप्रमाणे ९ मार्च रोजी पंचायत समिती येथील बचत भवन येथे शिबीर आयोजित केले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. धनंजय मेटकरी यांनी करून पिडीत नुकसान भरपाई व मनोधैर्य यावर माहीती दिली. अॅड. सोनिया गिराम यांनी महिलांविषयक विविध कायदयाची माहीती दिली. अॅड. सुनिता धनवडे यांनी हुंडा निषीध्द कायदा,
अॅड. विजयसिंह चव्हाण यांनी महिलांचे मालमत्तेमधील अधिकार व अॅड. शिवानंद पाटील यांनी कौटुंबिक हिंसाचार कायदयाची माहीती दिली. यावेळी सांगोला न्यायालयाचे तिसरे सह दिवाणी न्यायाधिश श्रीमती के.बी. सोनवणे यांनी आजची महिला सजग व सक्षम कशी होईल याबाबत मार्गदर्शन केले.
शिबीराचे शेवटी सांगोला न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश श्रीमती एस. के. देशमुख यांनी शिबीरातील विषयावर उदाहरणासह कायदेविषयक माहिती देवुन उपस्थित महिलांना विधी सेवा समितीबाबतही अवगत केले.
यावेळी सांगोला न्यायालयाचे सह दिवाणी न्यायाधिश श्री. यु. एम. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अॅड. गजानन भाकरे यांनी केले व कार्यक्रमाची सांगता सहायक गट विकास अधिकारी श्री. काळुखे यांनी आभार प्रदर्शनानी केली.
शिबीरास अंगणवाडी सेविकांनी उत्साहात सहभाग घेतला यावेळी सांगोला विधीज्ञ संघाचे अध्यक्ष अॅड. धनंजय मेटकरी व पदाधिकारी तसेच विधीज्ञ, पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी, न्यायीक कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता न्यायालयीन कर्मचारी वरीष्ठ लिपीक डी.बी.राहीरकर, लिपीक ए. एस. यादव तसेच श्री शिंदे, श्री माळी , श्री अंटद यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments