google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला नगरपालिकेच्या कर्मचारी महिलानी स्वच्छतेची घेतली शपथ व रॅलीचे शुभारंभ

Breaking News

सांगोला नगरपालिकेच्या कर्मचारी महिलानी स्वच्छतेची घेतली शपथ व रॅलीचे शुभारंभ

 सांगोला नगरपालिकेच्या    कर्मचारी  महिलानी स्वच्छतेची घेतली शपथ व रॅलीचे शुभारंभ

सांगोला नगरपरिषदेचे महिला व पुरुष कर्मचारी वृंद यांनी परिसर स्वच्छतेबाबत तसेच कचरा घंटागाडीच टाकावा, ओला सुका कचरा वर्गीकरणाचे महत्व, शून्य कचरा प्रणाली अंतर्गत 

ओला कचरा घरच्या घरी जिरवण्यासाठी होम कंपोस्टिंग, सुका कचऱ्याचे पुनर्वापर करण्यासाठी जनजागृती, प्लास्टिकचे वापर टाळून कापडी पिशवीचा वापर करणे बाबत, आदि संदर्भात या वेळी मार्गदर्शन करण्यात आले. 

त्यानंतर मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी व नगर परिषद अधिकारी यांच्या समवेत उपस्थित सर्व महिलांनी स्वच्छते संदर्भातील स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. 

त्यानंतर रॅलीचे शुभारंभ करण्यात आला.या रॅलीमध्ये सर्व महिलांनी स्वच्छतेबाबत च्या स्वच्छ सांगोला सुंदर सांगोला या घोषणा दिल्या. 

या वेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सर्व स्वच्छता निरीक्षक, स्वछता दूत, बचतगट सदस्य तसेच इतर संबंधित महिला व सफाई कर्मचारी इ उपस्थित होते. 

सदर मशाल मार्च रॅली यशस्वी पार पाडण्यासाठी सांगोला नगरपरिषदेच्या 

शहर समन्वयक तेजश्री निशांत बगाडे व कार्यालयीन अधिक्षक विजयकुमार कन्हेरे व सहा प्रकल्प अधिकारी योगेश गंगाधरे व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सदर रॅलीची सांगता स्वच्छतेची शपथ घेवून झाली.

Post a Comment

0 Comments