भाईंच्या देवराईत जलशुद्धीकरण प्लांट
ॲड.सचिन देशमुख;देवराई झाली दीड वर्षाची.
सांगोला/प्राजक्ता हालंगडे. विक्रमादित्य आमदार स्व.गणपतराव देशमुख यांच्या स्मृती अजरामर राहाव्यात तसेच पर्यावरणाचे सावर्धान व्यावे यासाठी उभारण्यात आलेल्या भाईंच्या देवराईस दीड वर्षे झाली असून,जिल्हा परिषद सदस्य ॲड.सचिन देशमुख यांनी यांच्या फंडातून दीड लाख रुपयाचा जलशुद्धीकरण प्लांट नुकताच उभा केला आहे.
याच प्लांटचे उद्धाघाटन सांगोला तालुका खरेदी विक्री संघाचे व्हाइस चेअरमन तुकाराम भुसनर यांच्या हस्ते करण्यात आहे.
भाईंची देवराई प्रकल्प हा स्व. आम.गणपतराव देशमुख यांच्या नावाने डिकसळ येथे साकारण्यात आला आहे.सध्या हीच देवराई दिड वर्षाची झाली असून,यामध्ये 118 जातीची बाराशे झाडे आहेत.पर्यावरण समृद्धीचे चांगलेच काम येथे देवराई प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी चांगल्या प्रकारे केले आहे.हाच प्रकल्प राज्यात नावारूपास आला असून,सतत विविध उपक्रम येथे पार पाडीत आहेत.
अनेक मान्यवर मंडळी सतत या प्रकल्पास भेट देत असून,येथील ही पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून जिल्हा परिषद सदस्य ॲड.सचिन देशमुख यांनी दीड लाख रुपयाचा प्लांट मंजूर केला होता. यात प्लांटची उभारणी करण्यात आली आहे.याचा लोकार्पण सोहळा सांगोला तालुका खरेदी_विक्री संघाचे व्हाइस चेअरमन तुकाराम भुसनर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी संतोष करांडे,बंडू वाघमोडे संतोष सकट,बापू करांडे,विजय पाटणे यांच्यासह देवराई प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येनी उपस्थित होते. हीच देवराई सध्या चांगल्या प्रकारे साकारली असून,येत्या 13 ऑगस्ट 23 रोजी याच प्रकल्पाचं दोन वर्ष पुर्ण होत आहेत.
भविष्यात हा प्रकल्प चांगल्या प्रकारे पर्यावरणाचे काम करणार असून,निसर्गाच्या सान्निध्यातील या देवराईमुळे गावाचेही नाव राज्यात झाले आहे.आताही सतत विविध उपक्रम येथे पार पडीत आहेत.यासाठी सांगोला येथील धनगर समाज सेवा मंडळाने भव्यदिव्य अशी स्वागत कमान उभा केली आहे.
अनेक मान्यवर मंडळींनी आकर्षक असे बाकडे तर श्री श्री रविशंकर महाराज यांच्या नावे असलेल्या राजेवाडी येथील कारखान्याच्या वतीने रेस्ट हाऊस,स्व.आबासाहेबांचे स्मारक तर भव्यदिव्य ग्रंथालय ही येथे साकार होणार आहे.


0 Comments