खवासपूर 'जल जीवन मिशन' या योजने अंतर्गत नळ पाणीपुरवठ्याचे काम बंद पाडले
२२ जणांवर सांगोला पोलिसात गुन्हा
सांगोला : सांगोला तालुक्यातील खवासपूर येथे प्रकाश भोसले यांच्या राहत्या घराजवळ 'जल जीवन मिशन' या योजने अंतर्गत नळ पाणीपुरवठ्याचे काम चालू असताना वीस ते बावीस नागरिकांनी येऊन दमदाटी करून काम बंद पाडले.
याबद्दल पाणीपुरवठा उपअभियंता सुरेश भीमराव कमळे यांनी सांगोला पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.
खवासपूर येथील प्रकाश भोसले यांच्या राहत्या घराजवळ २२ मार्च २३ रोजी नवीन नळ पाणीपुरवठा योजनेचे काम चालू होते. कामाचे ठेकेदार बेहरेचिंचोली येथील धनाजी घाडगे यांनी घेतला आहे.
ते काम पोकलेन या यंत्राच्या साह्याने चालक गणेश पाटोळे व शिवकुमार प्रजापती हे काम करीत असताना त्या गावातील नामदेव यादव यांच्यासह वीस ते बावीस लोकांनी येऊन काम बंद करा असे म्हणत दमदाटी केली.
पीव्हीसी पाईप मोडून वाकवून अंदाजे ३० हजार रुपयांचे नुकसान केले. उपअभियंता सुरेश कमळे ग्रामसेविका बरकडे व प्रशासक सिध्देश्वर नागटिळक पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांच्याबरोबर अरेरावीचे वर्तन केले. २२ लोकांच्या विरोधात कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे.


0 Comments