google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जि. प .प्रा. शाळा धायटी येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

Breaking News

जि. प .प्रा. शाळा धायटी येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

 जि. प .प्रा. शाळा धायटी येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

सांगोला/प्रतिनिधी.समाधान मोरे

   धायटी ता .सांगोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धायटी येथे जागतिक महिला दिनानिमित्त माता पालक मेळावा,विविध स्पर्धा व व्याख्याने आणि मातृपूजन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रास्ताविकानंतर

मान्यवरांच्या शुभहस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेतील मुलींनी सुमधुर आवाजात ईशस्तवन सादर केले. उपशिक्षिका श्रीमती कांचन ढेरे मॅडम यांनी मुलांचे आरोग्य व उपस्थिती याविषयी सखोल मार्गदर्शन केले. 

मुलांच्या आरोग्याबाबत स्वच्छता राखणे, उघड्यावरचे अन्नपदार्थ न खाणे  पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर करणे, पाडले आजारी पडल्यास मुलांची काळजी घेणे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. उपशिक्षिका श्रीमती तस्नीम काझी मॅडम यांनी शाळेतील विविध उपक्रमांची माहिती देत

 ,सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनासाठी माता पालकांनी सहकार्य करण्याची विनंती केली. उपशिक्षिका श्रीमती रोहिणी भागवत यांनी घरातील सर्वांच्या आरोग्याबरोबरच स्वतःची काळजी घ्यावी, परिपूर्ण पौष्टिक व सकस आहार घ्यावा व समाजात आपले स्थान निर्माण करावे असा संदेश दिला.

   महिला दिन साजरा करतेवेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या मातेचे  व शिक्षिकांचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. या महिला दिनाच्या निमित्ताने उखाणे, लिंबू चमचा व लकी ड्रॉ स्पर्धा घेण्यात आल्या.

उखाणे स्पर्धेमध्ये प्रथम सौ. चंदाराणी अंबादास भोसले, द्वितीय  .सौ. पुजा ब्रह्मदेव कोळेकर तर उत्तेजनार्थ सौ. अर्चना गणेश पाटील यांना मिळाला. तसेच लिंबू चमचा स्पर्धेमध्ये प्रथम क्र. सौ.अश्विनी दयानंद बनसोडे, द्वितीय क्र.सौ. माधुरी शशांक पाटील यांनी पटकावले. लकी ड्रॉ मध्ये सौ.पुजा संदीप बनसोडे,सौ. माधुरी शशांक पाटील या विजेत्या ठरल्या.

दोन्ही स्पर्धांमध्ये सर्व महिलांनी उत्स्फुर्त असा प्रतिसाद नोंदविला . सर्व विजेत्या महिलांना सुंदर अशा भेटवस्तू देण्यात आल्य उपशिक्षिका श्रीमती  संजना माने यांनी उपस्थित सर्व मातांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती महिला सदस्या

 सौ .विजया राजेंद्र भोसले, सौ विद्या दादासो भुसे,सौ.आशा  हणमंत भोसले ,सौ.अश्विनी संदीप बनसोडे ,सौ.मयुरी सचिन सरगर यांच्याबरोबरच अनेक माता,ग्रामस्थ महिला ,अंगणवाडी मदतनीस व शाळेच्या माजी विद्यार्थिनी  ,शाळेतील सर्व मुले मुली यांची उपस्थिती होती.

या महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती महिला सदस्या विजया राजेंद्र भोसले, अश्विनी संदीप बनसोडे, विद्या दादासो भुसे, आशा हनुमंत भोसले, मयुरी सचिन सरगर तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या माता यांनी सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन शाळेचे

 मुख्याध्यापक श्री.निसार  इनामदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षिका व स्वयंपाकी ताई सौ.विदया रणजित बनसोडे यांनी केले.शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.गणेश कदम व उपाध्यक्ष श्री.शत्रुघ्न कोळेकर व सर्व सदस्य ,पालक यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments