google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्याच्या आमदार शहाजीबापू पाटील यांची श्रीगोंदेकरांना भुरळ

Breaking News

सांगोल्याच्या आमदार शहाजीबापू पाटील यांची श्रीगोंदेकरांना भुरळ

 सांगोल्याच्या आमदार शहाजीबापू पाटील यांची श्रीगोंदेकरांना भुरळ

काय झाडी,काय डोंगर,काय हॉटेल या एका डायलॉग मुळे प्रचंड प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटलांनी श्रीगोंदेकरांना चांगलीच भुरळ पाडली नेहमी टीव्ही वर दिसणारे किंवा सोशल मीडियात ज्यांचा डायलॉग नेहमी कानावर पडतो 

असे आमदार शहाजी बापू स्वतः श्रीगोंद्यात आल्याची वार्ता वाऱ्यासारखी शहरात पसरली आणि मग काय बापूंसोबत फोटो काढण्यासाठी तरुणांसह प्रौढ,वयोवृद्ध लोकांची एकच झुंबड उडाली आणि मग बापूंनी देखील आपण प्रसिद्ध आमदार असल्याचा अजिबात अविर्भाव न बाळगता मनमोकळेपणाने श्रीगोंदेकर जनतेसोबत फोटोसेशन केले सर्वांशी मनमोकळा संवाद साधला

त्याचे झाले असे की आज पेडगाव येथे बहादूरगडावर छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीच्या वतीने बलिदान,स्फूर्तिदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

 त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जात असताना आ शहाजी बापू हे श्रीगोंद्यात थांबले होते त्यांच्यासोबत काष्टी गावचे सरपंच साजन पाचपुते,राहुल पाचपुते,अमोल टीमुने,शिवव्याख्याते सुदर्शन शिंदे हे उपस्थित होते

शहरातील पेडगाव चौकात नुकतेच काँग्रेस मधून शिंदे गटात(शिवसेनेत)प्रवेश केलेले नगरसेवक प्रशांत गोरे,नगरसेवक संतोष कोथिंबीरे,नगरसेवक गणेश भोस,नगरसेवक निसार बेपारी यांनी आ शहाजी पाटील यांचे शहराच्या वतीने स्वागत केले

 यावेळी तिथे माजी उपनगराध्यक्ष राजू गोरे,शिवसेना शिंदे गटाचे नगर जिल्हा उपसंपर्कप्रमुख संतोष शिंदे यांच्यासह अशोक गोंधळी,ऍड गौरव गाडीलकर,प्रवीण होले,सनी कोथिंबीरे,नितीन कादबने,प्रवीण कोथिंबीरे यांच्यासह मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते

यावेळी बापूंनी उपस्थित लोकांशी मनमोकळेपणाने संवाद साधत आपल्या जुन्या राजकीय आठवणींना उजाळा दिला

तसेच काल राज्य सरकारने जाहीर केलेला अर्थसंकल्प हा आतापर्यंतचा सर्वात व्यापक,सर्वसमावेशक व चांगला अर्थसंकल्प असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले यानंतर बसस्थानक परिसरात नगरसेवक अशोक खेंडके यांच्यासह भाजप च्या नगरसेवकांनी आ पाटील यांचे स्वागत केले तेथेसुद्धा शहाजी बापूंना पाहायला मोठी गर्दी जमा झाली होती

एक बाहेरचा आमदार एवढ्या साध्यापद्धतीने मनमोकळे पणाने बिनधास्त गप्पा मारत असल्याचे पाहून उपस्थित लोकांना त्याचे नवल वाटले आमदार पाटलांचा हाच साधेपणा आणि त्यांच्या भाषाशैलीने उपस्थितांना चांगलीच भुरळ घातली

चौकट/-तालुक्यातील नेत्यांबद्दल खंत आणि नाराजी

एकीकडे शहाजी बापू असतील किंवा पारनेर चे आमदार निलेश लंके असतील हे बाहेरून तालुक्यातील अगदी छोट्यामोठ्या कार्यक्रमांना कुणीही निमंत्रण दिले तरी कुठलीही कारण न सांगता आवर्जून हजेरी लावतात 

इथं येऊन तरुणांशी तसेच त्यांच्या कार्यकर्ते विरहित लोकांशी मनमोकळ्या गप्पा मारतात त्यांचं म्हणने ऐकून घेतात तर दुसरीकडे मात्र श्रीगोंदा तालुक्यातील काही एक नंबर फळीतील तरुण नेते त्यांच्याच कार्यकर्त्यांसह इतर लोकांचे फोन उचलत नाहीत,

किंवा काही नेत्यांना कार्यक्रमाला बोलावलं तरी ते उपस्थित राहत नाहीत नेत्याकडे एखादं काम घेऊन जायचं असेल तरी संबंधित नेत्यांना थेट न भेटता त्यांच्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन भेटावं लागत तालुक्यातील नेत्यांच्या या वागणुकीबाबत श्रीगोंदा तालुक्यातील जनतेमधून खंत व्यक्त होत आहे

चौकट/-बहादूरगडावरील कार्यक्रमात अभ्यासपूर्ण भाषणाला टाळ्यांची दाद

श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील ऐतिहासिक अश्या बहादूरगडावर आयोजित कार्यक्रमात आ पाटलांनी आपले मनोगत व्यक्त करताना इतिहासातील दाखले देत छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान हे जगात पोहोचले आहे असे सांगून तरुणांनी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असे आवाहन केले यावेळी त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणाला उपस्थितांनी टाळ्या वाजवून चांगलीच दाद दिली 

Post a Comment

0 Comments