google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्त सांगोला येथे महास्वच्छता अभियान संपन्न ७०१ श्री सदस्यांनी गोळा केला १६३ टन कचरा

Breaking News

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्त सांगोला येथे महास्वच्छता अभियान संपन्न ७०१ श्री सदस्यांनी गोळा केला १६३ टन कचरा

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्त

सांगोला येथे महास्वच्छता अभियान संपन्न ७०१ श्री सदस्यांनी गोळा केला १६३ टन कचरा

महाराष्ट्र भूषण, तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा जिल्हा रायगड आयोजित महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप श्री नानासाहेब धर्माधिकारी जन्मशताब्दी निमित्त  सांगोला शहर येथे डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने महास्वच्छता अभियान संपन्न झाले.

यावेळी सांगोला तालुक्यातील ७०१ श्री सदस्यांनी च्या माध्यमातून १६३ टनाच्या पुढे ओला व सुका कचरा गोळा करून कचरा डेपो मध्ये पाठवण्यात आला

 यासाठी नगरपरिषद सांगोला कडून ८ घंटागाडी २ टिप्पर, १ जेसीबी तसेच श्री सदस्यांकडून १७ ट्रॅक्टर, ६ छोटा हत्ती यांच्या माध्यमातून सर्व कचरा गोळा केला गेला यासाठी नगरपरिषद सांगोलाचे मुख्याधिकारी सुधीर गवळी, कार्यालय अधीक्षक अधिकारी विजय कन्हेर , आरोग्य अधिकारी विनोद सर्वागोड यांचे विशेष सहकार्य मिळाले.

सदर अभियानाची सुरुवात छ. शिवाजी महाराज चौक येथून सकाळी ७.०० मुख्याधिकारी श्री सुधीर गवळी यांचे हस्ते श्री गणेश पूजन करून, छ. शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. तसेच या अभियानाची सांगता ही छ. शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी सुधीर गवळी म्हणाले की, आजचे कार्य बघून आम्ही सर्व भारावून गेलो आहोत. 

या प्रतिष्ठानने आज पर्यंत अनेक समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित केले व ते उत्तम रीतीने पूर्ण केले आहेत. ज्या मध्ये वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन, रक्तदान शिबिर, आरोग्य शिवीर, जलपुनर्भरण, या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे.

या वेळी आरोग्य अधिकारी विनोद सर्वगोड यांनी आपल्या मनोगतात असे नमूद केले की गणेश उत्सवाच्या वेळी प्रतिष्ठानने निर्माल्य गोळा केले व त्यापासून कंपोस्ट खत तयार करून आलेगाव येथे लागवड केलेल्या १५०० झाडांना घालून पर्यावरण संरक्षणाचे खुप मोठे कार्य केले आहे.

 मुख्याधिकारी सुधीर गवळी म्हणाले की, आज तुम्ही आमचा सत्कार करण्यापेक्षा आम्ही सांगोला नगरपरिदेच्या वतीने तुम्हा सर्व श्रीसदस्यांचा सत्कार करणार आणि त्यांनी सन्मानपत्र देऊन सत्कार केला. 

व या पुढे प्रतिष्ठानच्या प्रत्येक समाज उपयोगी कार्यक्रमात नगर पालिका संपूर्ण सहकार्य करेल अशी ग्वाही दिली. स्वच्छता मोहीम पूर्ण करून शहर स्वच्छ झाल्याची भावना सर्व प्रशासन व नागरिकांतून व्यक्त होत आहे. आजची स्वच्छता मोहिम प्रतिष्ठानचे ७०१ सदस्यांनी स्वयंस्फूर्तीने करतात याचे मान्यवरांनी कौतुक केले आहे.

 श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे सामाजीक बांधिलकीची जाणीव ठेवून सतत स्वच्छता अभियान, वृक्षरोपण आणी संवधन रक्त दान शिबीरे, शैक्षणीक साहित्य वाटप, आरोग्य शिबीरे, धरणातील गाळ काढणे आदी उपक्रम राबविले जातात याचीही आठवण उपस्थित पाहुण्यांनी करुन दिली.

 

Post a Comment

0 Comments