मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने श्रीकांतदादा देशमुख यांना मोठा दिलासा
भारतीय जनता पार्टीचे सोलापुर जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत आप्पासाहेब देशमुख यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर करून देशमुख यांना मोठा दिलासा दिला आहे.तसेच अटकपूर्व जामीन मंजूर करत मुंबई उच्च न्यायालयाने कायमस्वरूपी अर्ज निकाली काढला आहे.
मुंबई उच्च न्यायालयत श्रीकांतदादा देशमुख (माजी जिल्हाध्यक्ष भाजप ) यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली.
सदर अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायमूर्ती श्रीम.अनुजा प्रभू देसाई यांच्यापुढे सुनावणी झाली असता. न्यायमूर्तींनी श्रीकांतदादा देशमुख यांचा सदर प्रकरणातील अटकपूर्व जामीन मंजूर करत कायमस्वरूपी अर्ज निकाली काढला आहे.
मुंबई उच्च न्यायालयात श्रीकांतदादा देशमुख यांच्या बाजूने वरिष्ठ विधीज्ञ श्री शिरीष गुप्ते, श्री आशिष गायकवाड, श्री उज्वल अंगदसुर्वे यांनी यशस्वीरित्या कायदेशीर बाजू मांडली.
उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करतेवेळी म्हटले आहे की, तक्रारदार व अर्जदार यांचे एकमेकांचे २०१८ पासूनचे नातेसंबंध आणि जुनी मैत्री होती. त्याचबरोबर अर्जदार हे विवाहित होते याची पूर्ण जाणीव तथा याची पूर्ण कल्पना तक्रारदार महिलेस पहिल्यापासूनच होती.
तरी आपसातील प्रेम संबंध परस्पर सहमतीनेच ठेवले व तसे तक्रार दाखल करेपर्यंत त्यांनी ठेवले होते. त्यामुळे अशा स्वरूपाच्या सदर घटना हा बलात्कार सारखा गुन्हा केला असे म्हणता येणार नाही.
असे मत नोंदवून पुढील तपासा दरम्यान श्रीकांत देशमुख यांना पोलीस अधिकाऱ्यास वेळोवेळी उपस्थित राहून असेच सहकार्य करण्याचे आदेश पारित केले आहेत. याबाबतची माहिती अँड. आशिष गायकवाड (वकील उच्च न्यायालय) यांनी दिली आहे


0 Comments