google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बामसेफचे सर्वेसर्वा मा.वामनजी मेश्राम यांनी डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांची घेतली सदिच्छा भेट

Breaking News

बामसेफचे सर्वेसर्वा मा.वामनजी मेश्राम यांनी डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांची घेतली सदिच्छा भेट

बामसेफचे सर्वेसर्वा मा.वामनजी मेश्राम यांनी डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांची घेतली सदिच्छा भेट

सांगोला /प्रतिनिधी – बामसेफचे सर्वेसर्वा मा.वामन मेश्राम हे सोलापुर जिल्हा दौऱ्यावर आले होते.. रविवारी दिनांक 26/2/2023 रोजी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांची सदिच्छा भेट घेतली..

स्व गणपतरावजी देशमुख ऊर्फ आबासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन केले..

 स्व गणपतरावजी देशमुख उर्फ आबासाहेब यांनी शेतकरी कष्टकरी कामगार यांचे नेतृत्व केले आसलेचे बामसेफचे सर्वेसर्वा वामन मेश्राम यांनी डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्याशी बोलताना व्यक्त केली भावना   सध्या स्व आबासाहेबांसारखे नेते दुर्मिळ झाले आहेत.राजकारणामध्ये निष्कलंक राहुन समाजसेवा करणे फार अवघड काम आहे..

हे काम स्व आबासाहेबांनी संपूर्ण हयातभर केले.आबासाहेबांनी विचारधारा कधीच सोडली नाही.विचारधारेशी तडजोड कधी केली नाही.सांगोला विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करीत असताना तालुक्यांमध्ये सर्वधर्म समभाव रुजवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले..

मतदार  संघाचा विकास करीत असताना शेवटच्या घटकाचा विचार करुन विकास साधला … शेतकरी कष्टकरी कामगार दलीत व महिला यांच्या सन्मानासाठी प्रयत्न केले.   डॉ बाबासाहेब देशमुख यांना बोलताना मा.वामन मेश्राम म्हणाले की.

आपणास विचारांचा वारसा आहे.आपण आबासाहेबांच्या विचारांवर पाऊल टाकत समाजसेवा करावी तेवढीच अपेक्षा आपणाकडुन ठेवत असलेले म्हणाले.. डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌ यांनी सुध्दा मेश्राम साहेबांना सकारात्मक प्रतिसाद दिला. ‌‌

सदर‌ भेटी दरम्यान बहुजन नेते बापुसो ठोकळे,किशोर‌ बनसोडे,दिपक बनसोडे, आबासाहेब शेजाळ (गुरुजी )बशीर‌भाई तांबोळी,आकाश‌ व्हटे इत्यादी नेते‌ उपस्थित असलेल्याचे शेकापचे प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments