google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 लज्जास्पद घटना... ऊसतोड टोळीतील तरुणीवर मुकादमाकडून अत्याचार; बायकोचं देत होती पहारा

Breaking News

लज्जास्पद घटना... ऊसतोड टोळीतील तरुणीवर मुकादमाकडून अत्याचार; बायकोचं देत होती पहारा

लज्जास्पद घटना... ऊसतोड टोळीतील तरुणीवर मुकादमाकडून अत्याचार; बायकोचं देत होती पहारा

उसाच्या फडातील खोपीमध्ये मुकादमाने आपल्याच ऊस तोडीच्या टोळीतील एका तरुणीवर बळजबरीने बलात्कार केल्याच धक्कादायक घटना घडली आहे. संतापजनक बाब म्हणजे, हे सर्व घडत असताना चक्क आरोपीच्या बायकोनेच खोपीच्या बाहेर उभे राहून रखवालदारी केल्याची

 लज्जास्पद घटना जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातील रायगव्हाण शिवारात घडली आहे. या घटनेनंतर सादर पीडितेने अंबड पोलीस ठाणे गाठून आपली आपबिती सांगत तक्रार दखल केल्यानंतर त्या मुकादमावर गुन्हा दाखल करण्यात येऊन पुढील कारवाईसाठी सदरील गुन्हा आष्टी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

सदर महिला ही उसतोड मुकादम राम जाधव रा.रामगव्हाण खुर्द यांच्या टोळीत गेल्या चार महिन्यांपासून आष्टी ता. परतुर जवळील रायगव्हाण शिवारात उसतोडीचे काम करत होती. 

शुक्रवारी दिनांक २७ रोजी सकाळी ६.३० वाजेला ऊसाच्या फडात ऊस तोडणी करत असताना मुकादम राम याची बायको वर्षा जाधव हिने तिला तिच्या मोबाईलवर फोन करून आष्टी ता.परतुर जवळील टोळी अड्ड्यावर बोलावून घेतलं. त्यावेळी मुकादम राम हा त्याच्या खोपीत होता. वर्षा हिने सदरील महिलेला त्याच्या खोपीत पाठवलं आणि खोपी बाहेरून लावून घेतली. 

काहीतरी अघटीत होत असल्याची शंका येताच पीडित महिलेनं आरडा-ओरडा करून खोपी उघडण्याचं सांगितलं असता वर्षा हिने राम "तुला मारुन टाकील" अशी धमकी देत वेगळ्या भाषेत मुकादम रामला काहीतरी बोलली व लगेच खोपीच्या बाहेर निघून गेली. 

खोपीत गेल्यानंतर राम याने तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न केला असता तिने त्याला विरोध केला. पण रामने तिची इच्छा नसताना बळजबरीने शारिरिक संबंध केले. शारीरिक संबंध झाल्यानंतर मुकादम राम व त्याची बायको वर्षा दोघांनी तिला "उसतोड टोळीत कोणाला सांगितलं तर तुला जीवे मारुन टाकू" अशी धमकी दिली.

दरम्यान, पीडित तरुणी त्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आष्टी पोलीस ठाणे येथे जात असताना वर्षा हिने तिला धमकावले की, "तुला इथे तक्रार देता येणार नाही, त्यासाठी तुला अंबड पोलीस ठाणे येथे जावं लागेल". त्यानुसार पीडितेनी अंबड पोलिस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. 

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता संबंधितांवर गुन्हा दाखल करून पुढील कारवाईसाठी आष्टी पोलीस ठाण्यास वर्ग केला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी भा.द.वि कलम ३७६ आणि ५०६ अन्वये गुन्हा नोंद करून राम जाधव या आरोपीला अटक केली आहे.

Post a Comment

0 Comments