सोलापूर! प्रियकरानेच केला प्रेयसीचा खून
प्रियकरानेच प्रेयसीचा खून केल्याची घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. अक्कलकोटमध्ये घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
एका महिलेने आत्महत्या केली होती. मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. 27 वर्षीय भारताबाई या महिलेचा प्रियकरानेच खून केला.
या महिलेचे बाळू माळू या तरुणासमोर प्रेम संबंध होते. तिने बाळूकडे लग्नासाठी तगादा लावला होता. दरम्यान बाळूचे नात्यातील एका मुलीसोबत लग्न ठरले. या लग्नास भारताबाईचा मोठा विरोध होता.
आपल्या लग्नास आड येणाऱ्या प्रेयसीचा काटा काढण्याचा विचार बाळूने केला. पहाटे आळगी यांच्या शेतात तिला बोलावून घेतले. भारताबाईच्या साडीने एका झाडाला गळफास देऊन तिचा खून केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी बाळू याला अटक केली आहे.


0 Comments