बाईकला धक्का लागल्याने रिक्षा चालकाचा खून
बाईकला रिक्षाचा धक्का लागल्याने झालेल्या वादातून दोन तरूणांनी रिक्षाचालकाला बेदम मारहाण करून त्याच्या खून केल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंप चौकात घडली.
पसार झालेल्या बाईकस्वारासह साथीदारास दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. किरण राजू दांडेकर (वय ३०, रा. पर्वती दर्शन) असे खून झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी मुकील गफूर शेख (रा. कोंढवा), अरबाज शेख (रा. कासेवाडी, भवानी पेठ) यांना अटक करण्यात आली.
रिक्षाचालक किरण याचा भाऊ मधुकर याने याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. किरण, त्याचा भाऊ मधुकर, बंटी कसबे आणि मित्र भापकर चौकातील पंपावर रिक्षात सीएनजी गॅस भरण्यासाठी निघाले होते. त्यावेळी बाईकस्वार मुकील याला रिक्षाचा धक्का लागला.
या कारणावरून रिक्षाचालक किरण आणि बाईकस्वार मुकील यांच्यात वाद झाला. आरोपी मुकील, त्याचा मित्र अरबाज यांनी किरण याला मारहाण केली. एका आरोपीने किरणच्या छातीवर लाथ मारली. मारहाणीत किरण बेशुद्ध पडला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.


0 Comments