पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर स्मारक समितीवर माझी निवड डॉ बाबासाहेब देशमुख
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे उभारण्यात येणारा राजमाता अहिल्यादेवींचा भव्य-दिव्य पुतळा हा विद्यापीठाजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरून दिसेल याची शाश्वती आज मी देतो......
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर स्मारक समितीवर माझी निवड केल्याबद्दल निवड समिती तसेच राज्य सरकारचे आभार मानतो माझ्यासोबत नव्याने निवड झालेल्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो....
उभारण्यात येणारा राजमाता अहिल्यादेवींचा भव्य-दिव्य पुतळा हा विद्यापीठाजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरुन दिसेल याची शाश्वती आज मी देतो…
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर स्मारक समितीवर माझी निवड झाल्याची बातमी आत्ताच समजली…
त्याबद्दल मी निवड समिती तसेच राज्य सरकारचे आभार मानतो व माझ्यासोबत नव्याने निवड झालेल्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो…
तुम्ही सर्वांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरवत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे भव्य- दिव्य असे स्मारक होण्याकरिता ,तसेच समाजातीस सर्व घटकांची भूमिका ,सर्वांच्या मार्गदर्शकपर सुचना प्रामाणिकपणे मांडण्याचा मी कायमच प्रयत्न करेन..
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या संस्थानाबाहेर जाऊन विकासकार्य केलं.
जात, धर्म, पंथ, प्रांताच्या सीमा ओलांडून देशभर पायाभूत सुविधांची निर्मिती केली. साडेतीनशे वर्षांपूर्वी राजकीय, प्रशासकीय, न्यायदानाच्या पद्धतीत अमूलाग्र सुधारणा घडवून आणल्या.
दूरदृष्टीच्या शासक, जगातल्या सर्वश्रेष्ठ स्त्री राज्यकर्त्या म्हणून राजमातांनी केलेलं कार्य अलौकिक आहे.
सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात उभारण्यात येत असलेलं हे स्मारक राजमातांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसं आणि गौरव वाढवणारं आहे आणि त्या समितीचा एक भाग -सदस्य होण्याचं सौभाग्य लाभले ही आनंदाची गोष्ट आहे..
हे स्मारक लवकरात लवकर आणि भव्य-दिव्य होईल, यासाठी मी कार्यरत राहण्याचा शब्द या नियुक्तीच्या निमित्ताने सर्वांना देतो..
अशीच तुमच्या सगळ्यांची साथ राहू द्या …
धन्यवाद !


0 Comments