Breaking News

नराधम बापाने पोटच्या मुलीवरच केला लैगिक अत्याचार..मा.न्यायालयाने दिली मरेपर्यंत जन्मठेप ....

 नराधम बापाने पोटच्या मुलीवरच केला लैगिक अत्याचार..मा.न्यायालयाने दिली मरेपर्यंत जन्मठेप ....

आज रोजी कन्हेरे ता. पारोळा जि. जळगाव येथील आरोपी रविंद्र शामराव पाटील, वय 39

 मा.न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली असून सविस्तर माहिती अशी की,

 स्पेशल पोक्सो केस नं. 06/2021. पारोळा पो. स्टे. गु.र.न. 07/2021 गुन्हा कलम 376(2). (आय). (जे). 506 भा.द.वि. व पोक्सो अॅक्ट 46 मधील 

आरोपी रविंद्रशामराव पाटील, वय 39 रा. कन्हेरे ता. पारोळा, जि. जळगांव यांनी फेब्रुवारी 2020 ते जुलै 2020 चे दरम्यान दिनांक 13/02/2020 रोजी पिडीताची आई ही त्यांचे भावाचे मेहुण्याचे लग्नानिमित्ताने पिंप्री, ता. रावेर, जि. जळगांव येथे मुक्कामी गेले असताना पिडीता घरी एकटी असताना, 

आरोपी त्यावेळेस दारु पिवुन येवुन घरी रात्री 11:00 वाजता पिडीता घरात एकटी झोपलेली असताना दरम्यानयातील आरोपी याने रात्रीचे वेळी पिढीतावर दारुचे नशेत जवळ जावुन तिचे अंगावर हात फिरवुन तिचे कपडे काढण्यास सांगत होता पिडीतेने नकार दिला असता चापटांनी मारहाण करून जबरदस्ती तिचे कपडे काढून बळजबरीने शारीरीक संबंध केले.

 तसेच त्या घटनेचे दुस-या दिवशी आरोपीने पिडीतेवर राहते घरात दिवसाच्या वेळी बळजबरीने शारीरीक संबंध केले. सदरघटनेबाबत पिडीतेने कोणास काहीएक सांगीतले तर स्वताः मरुन जाण्याची व पिढीतेस मारुन टाकरण्याची धमकी दिली असल्याचे पिडीतेन फिर्याद देतेवेळी सांगीतले आहे. 

आरोपीचे वडिल शामराव ओकार पाटील यांचे दिनांक 17.06.2020 रोजी निधन झाले निधनाचे उत्तरकार्य विधी संपल्यानंतर पिडीतेची आई परंपरेप्रमाणे तिचे गावातीलच माहेरी गेली त्यावेळी पिडीता व आरोपी हे राहत्या घरी होते 

त्यावेळी सुध्दा आरोपीने रात्रीच्या वेळी पिडीतेवर बळजबरीने लैंगिक संबंध प्रस्तापीत करुन स्वता मरुन जाण्याची व पिडीतेस मारुन टाकण्याची धमकी दिली. म्हणुन यातील आरोपी विरुद्ध गुन्हा कलम 376 (2). (आय), (जे). 506 भा.द.वि. व पोक्सो अॅक्ट 4 व 6 प्रमाणे अपराध केलेला आहे. 

त्यामुळे मा. न्यायालयात पिडीतेने आरोपी विरुद्ध खटला दाखल केलाअसता सदर कामी मा. जिल्हा न्यायाधीश 1 श्री. एस. बी. गायधनी साहेब यांचेपुढे सदरच्या खटल्याचे कामकाज चालले त्यात सरकारी वकील अॅड. किशोर आर. बागुल, मंगरूळकर यांनी एकुण 11 साक्षीदार तपासले. पैकी पिडीताची साक्ष तसेच 

सरकारी पंच व पिडीतेची आई व डॉ. विदयेश जैन, डॉ. सुप्रिया खांडे, डॉ. गणेश पाटील यांची साक्ष व तसेच न्यायवैदयानिक विभाग नाशिक यांचेकडीलडि.एन.ए. व रक्त तपासणी अहवाल महत्त्वाचे ठरले तपासी अधिकारी रविंद्र बागुल यांची साक्ष ग्राह्य धरून आरोपीस सदरचा

 खटल्या कामी आलेल्या पुराव्या वरून गुन्हा सिध्द झालेने बाल लैंगिक आत्याचार कलम 4 (2) प्रमाणे मरेपर्यन्त आजन्म कारावासाची (जन्मठेपेची शिक्षा व रुपये 1000/- दंड व दंड नभरल्यास तिन वर्षे सश्रम कारावास, तसेच बाल लैंगिक आत्याचार कलम 6 प्रमाणे मरेपर्यन्त आजन्म कारावासाची

 (जन्मठेपेची शिक्षा व रुपये 1000/- दंड व दंड न भरल्यास तिन वर्षे शिक्षा, तसेच भा.द.वि. कलम506 प्रमाणे 07 वर्षे सश्रम कारावास व 1000/- दंड व दंड न भरल्यास एक वर्षांचा सश्रम कारावास. होता. सदर आरोपी त्यांचे अटकेपासून कारागृहात या कामी पैरवी अधिकारी, उदयसिंग सांळुके व पो. कॉ. हिरालाल पाटील, अमळनेर यांनी काम पाहीले.

Post a Comment

0 Comments