सांगोला तालुक्यातील खिलारवाडीतील घटना..दुकान फोडून साडे सहा लाखांचा ऐवज लंपास
खिलारवाडी ता.सांगोला : किराणा दुकानाच्या मागचा दरवाजा तोडून चोरट्याने रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने असा ६ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
या चोरीचा गुन्हा सांगोला पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. आनंदराव रामचंद्र होळकर (रा. खिलारवाडी, ता. सांगोला) यांचे ग्रामपंचायत शेजारी आशीर्वाद किराणा स्टोअर्स हे दुकान आहे.
या दुकानाच्या मागील लाकडी दरवाजा तोडून कपाटातील १ लाख ५० हजार रुपयाची रोख रक्कम व दागिने असे सगळे मिळून सहा लाख ४७ हजार रुपये किमतीचे रोकडे सोन्या चांदीचे दागिने चोरट्याने चोरून नेल्याबद्दल सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


0 Comments