Breaking News

धक्कादायक घटना..सरपंच भावाचा केला खून अन् दाखवला अपघात, रक्तातील नात्यानेच केला गेम

धक्कादायक घटना..सरपंच भावाचा केला खून अन् दाखवला अपघात, रक्तातील नात्यानेच केला गेम

जालना जिल्ह्यातल्या एदलापूर येथील माजी सरपंच यांचा खून करून अपघात केल्याचा बनाव केल्याचं उघड झाले आहे.

काही दिवसांपूर्वी वाटूर जालना महामार्गावर एदलापूरच्या माजी सरपंचाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र हा अपघाती मृत्यू नसून खून असल्याची तक्रार मयताच्या नातेवाईकांनी दिली होती. त्यानुसार तपास करत पोलिसांनी अखेर हा अपघात नसून खून झाल्याचं उघड केलं आहे.

मयताच्या चुलत भावनेच कट रचून आधी अपघात करून खून केल्याचं सिद्ध झाले आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी बळीराम आनंदराव मरळ याला अटक केली आहे. 

यात आणखी काही आरोपींचाही उलगडा होणार असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.मयत सरपंच यांच्या चुलत भावानेच हा कट रचून आधी अपघात घडून आणून त्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या सरपंचाचा खून केल्याचे सिद्ध झाले. 

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी बळीराम आनंदराव मरळ याला अटक केली करत त्यांच्यासह काही आणखी जण या कटात सामील असल्याने त्या आरोपींचा शोध सुरू केला आहे. त्यातून काही आरोपी आणखी असण्याची शक्यता ही पोलिसांनी वर्तविली आहे.

Post a Comment

0 Comments