Breaking News

धक्कादायक घटना.. सोलापूर ! शेळगीतील अठरा वर्षे निशा चक्कर येऊन खाली पडली आणि..

धक्कादायक घटना..  सोलापूर ! शेळगीतील अठरा वर्षे निशा चक्कर येऊन खाली पडली आणि..

सोलापुरातील शेळगी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत निशा सोमवंशी वय 18 हिचा जागीच मृत्यू झाला. वास्तविक तिला पित्ताचा त्रास होता. 

यामुळे तिने दोन दिवस खाणे पिणे जवळपास बंद केले होते. मात्र अचानक आज तिला जास्त त्रास जाणवू लागला. ती चक्कर येऊन घरातच कोसळली. यातच तिचा मृत्यू झाला. निशा ही शेळगीतील विद्यानगर भाग एक येथे राहत होती.

 तिच्या पश्चात आई-वडील असा परिवार आहे. ती सोलापुरातील एका नामवंत महाविद्यालयात इयत्ता बारावीला शिकत होती. निशा ही अभ्यासात अत्यंत हुशार होती. लहान वयात निशाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments