google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक! जेवणं न देता, दारू प्यायल्याने दुसऱ्या पत्नीची रिक्षाचालकाने केली हत्या

Breaking News

धक्कादायक! जेवणं न देता, दारू प्यायल्याने दुसऱ्या पत्नीची रिक्षाचालकाने केली हत्या

 धक्कादायक! जेवणं न देता, दारू प्यायल्याने दुसऱ्या पत्नीची रिक्षाचालकाने केली हत्या

जेवायला दिले नाही आणि स्वत: दारु पिली या कारणावरुन एका रिक्षाचालकाने आपल्या दुसर्‍या पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन तिचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी परशुराम उदडंप्पा जोगन याला अटक केली आहे. 

सविता संदिप औचिते असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी गणेश दत्तात्रय शिंदे यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार अप्पर इंदिरानगरमध्ये सोमवारी पहाटे २ वाजता घडला होता. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परशुराम जोगन हा रिक्षाचालक आहे. सविता औचिते ही त्याची दुसरी पत्नी आहे. परशुराम यांच्या दारुच्या व्यसनामुळे काही वर्षांपूर्वी त्याची पहिली पत्नी त्याला सोडून गेली.

 तेव्हापासून परशुराम एकटाच होता. सविता औचिते ही मुळची उल्हासनगर येथील राहणारी असून ती पुण्यात मिळेल ते काम करुन रहात असे. तिची आणि परशुराम यांची ओळख झाली. त्यानंतर गेल्या १५ दिवसांपूर्वी ते अप्पर इंदिरानगर येथे भाड्याने जागा घेऊन राहू लागले. 

परशुराम जोगन हा गणेश शिंदे यांच्या रिक्षावर चालक म्हणून काम करीत होता. रविवारी रात्री उशिरा तो दारु पिऊन घरी गेला. तेव्हा त्यांची पत्नी सविता हिनेही दारु पिली होती. त्याने जेवायला वाढ असे सांगितले. त्यानंतरही तिने जेवायला न दिल्याच्या रागात त्याने सविता हिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. 

त्यात ती निपचित पडली. ती काही बोलत नाही. हलत नाही हे पाहिल्यावर परशुराम याने रिक्षामालक शिंदे यांना फोन करुन हे सांगितले. त्यानंतर त्यांनी तेथे येऊन पाहिले असता सविता हिचा मृत्यु झाला होता. त्यांनी बिबवेवाडी पोलिसांना कळविले.

Post a Comment

0 Comments