google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्ह्यात या तालुक्यातील तिघांचा पुण्यातील अपघातात मृत्यू

Breaking News

सोलापूर जिल्ह्यात या तालुक्यातील तिघांचा पुण्यातील अपघातात मृत्यू

 सोलापूर जिल्ह्यात या तालुक्यातील तिघांचा पुण्यातील अपघातात मृत्यू

पुणे सोलापूर मार्गावर दौंड तालुक्यातील चौफुला येथे अपघात झाला आहे. टायर फुटल्याने महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला लक्झरी बस धडकल्याने हा अपघात झाला. 

यात चार जण ठार झाले तर २० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांपैकी तीन पोलिस असल्याची माहिती आहे. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. जखमी असलेल्या काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

 नितीन शिंदे असे मृत पुणे पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याचे नाव आहे. शिंदे हे पुणे गुन्हे शाखेत युनिट २ मध्ये कार्यरत होते. मृत इतर तिघांची नावे अद्याप समजू शकली नाही. एक लक्झरी बस आज पहाटेच्या सुमारास सोलापूरहून पुण्याच्या दिशेने येत होती. 

यावेळी चौफुला ओलांडल्यानंतर वाखरी हद्दीत एका ट्रकचा टायर फुटल्याने तो ट्रक महामार्गावरच उभा होता. या उभ्या असलेल्या ट्रकचा अंदाज लक्झरी बस चालकाला आला नाही. यामुळे बस थेट ट्रकला जाऊन धडकली.

 हा अपघात एवढा भीषण होता की, बसच्या एक बाजूचा चक्काचूर झाला. या अपघातात अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील आरती अंबण्णा बिराजदार( वय 25), सलगरचे गणपती पाटील व गोगावचे अमर महांतेश कलशेट्टी यांचे अपघाती निधन झाले आहे.

Post a Comment

0 Comments