Breaking News

धक्कादायक प्रकार ...सासरा, पत्नी व मुलाला जिवंत जाळले

 धक्कादायक प्रकार ...सासरा, पत्नी व मुलाला जिवंत जाळले

शहरातील सुर्यटोला येथील तिघांना जिवंत जाळल्याची घटना उघडकीस आली आहे.

विशेष बाब म्हणजे आरोपी किशोर शेंडे याने सासऱ्याच्या घरी जात पत्नी, मुलगा व सासरा हे झोपेत असताना त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले. 

या घटनेत सासरे 52 वर्षीय देवानंद मेश्राम यांचा मृत्यू झाला तर आरती किशोर शेंडे व 4 वर्षीय जय किशोर शेंडे हे 90 टक्के भाजले आहे. सध्या जखमी मुलगा व आई नागपुरातील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. 

झोपेत सासरा, पत्नी आणि मुलाच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटून दिल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. त्याने हे कृत्य का केलं याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये. आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Post a Comment

0 Comments