परीक्षेच्या वेळी शिक्षकाने केला दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग ! सोलापूर जिल्ह्यातील घटना..
परीक्षेचा पेपर सुरु असताना एका शिक्षकाने दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून रंगेल मास्तर चांगलाच गोत्यात आला आहे.
शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात एक पवित्र नाते असते परंतु काही मास्तर या नात्यालाच कलंक लावताना दिसतात. आपल्याच विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणाऱ्या काही शिक्षकांना तुरुंगात जाऊन बसण्याची वेळ आली आहे तरी देखील काही रगेल आणि रंगेल मास्तर लाळघोटेपणा करायचा सोडत नसल्याचे दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात पुन्हा एकदा अशीच घटना घडली.
असून या रंगेल मास्तरच्या विरोधात पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून पालकांतून संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचा आणि परीक्षा सुरु असतानाही त्याने विनयभंग केल्याचा गुन्हा या शिक्षकावर दाखल झाला आहे.
मोहोळ येथील एका शाळेत नववीत शिकणाऱ्या पिडीत मुलीचा मराठीचा पेपर होता. ६ जानेवारी रोजी परीक्षा सुरु असताना सिद्धेश्वर वागज हा शिक्षक पिडीत मुलीच्या बाकाजवळ गेला आणि तिचा हात धरून तिच्या हातातील घड्याळ पाहण्याचा बहाणा करू लागला. त्यानिमित्ताने तो तिच्या हाताला स्पर्श करीत होता. या प्रकारामुळे मुलीने विरोध केला असता 'गप्प बस, नाहीतर तुझे मार्क कमी करील' अशी धमकी दिली.
घाबरलेली पिडीत मुलगी गप्प बसली आणि आपल्या समोरील मराठीचा पेपर लिहिला. पेपर झाल्यानंतर ही पिडीत मुलगी आणि तिची एक मैत्रीण घरी निघाले असताना या दोन्ही मुलीकडे वाईट नजरेने पहिले असल्याची फिर्याद वागज याच्या विरोधात दाखल झाली आहे.
दरम्यान सायंकाळी पिडीत मुलीची मैत्रीण पिडीतेच्या घरी गेली आणि तिने आपल्याबाबतही शिक्षकाने केलेला धक्कादायक प्रकार कथन केला. परीक्षा सुरु असताना सदर शिक्षक सतत आपल्या बाकावर येवून बसत होते आणि बसू नका असे सांगूनही ऐकत नव्हते, उलट मलाच मोबाईल नंबर मागत होते.
'माझ्याकडे मोबाईल नाही, वडिलांचा मोबाईल मी वापरत असते' असे सांगितले त्यानंतर त्यांनी माझा हात धरला. 'तू माझ्यासाठी खास आहेस' असे म्हणत या शिक्षकाने एका कागदावर स्नॅपचॅट ऍप्लिकेशन आय डी लिहून देत मेसेज करण्यासाठी सांगू लागला.
घरी आल्यानंतर वडिलांचा मोबाईल घेऊन अभ्यासाला सुरुवात केली तेंव्हा पुन्हा या शिक्षकाचा मेसेज आला. 'तू माझ्यासाठी खास आहेस' असा मेसेज या शिक्षकाने पाठवला. अशी माहिती या दुसऱ्या मुलीनेही पीडित मुलीला दिली.
दोन्ही मुलीच्या बाबतीत असा प्रकार घडल्यामुळे दोघीनींही याबाबत आपल्या पालकांना माहिती दिली. अखेर पीडित मुलीच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आता हा 'मास्तर' चांगलाच गोत्यात आला आहे.
मोहोळ तालुक्यात या वागजची चर्चा सुरु झाली असून पालकातून मात्र प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला आहे. बोटावर मोजण्याएवढे काही शिक्षक कलंकित काम करतात आणि त्यामुळे पवित्र असलेल्या शिक्षकी पेशाला देखील धक्का लागू लागला आहे त्यामुळे शिक्षण क्षेत्रातून देखील नापसंती व्यक्त होताना दिसत आहे.


0 Comments