google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर! व्यापाऱ्याची घरी चक्रावून सोडणारी चोरी

Breaking News

सोलापूर! व्यापाऱ्याची घरी चक्रावून सोडणारी चोरी

 सोलापूर! व्यापाऱ्याची घरी चक्रावून सोडणारी चोरी

सोलापूर- चोरटे कधी कुठल्या वस्तूवर डल्ला मारतील सांगता येत नाही, अशीच एक घटना

 सोलापुरातील दक्षिण कसबा येथील शनी मंदिराजवळ राहणारे आशिष पद्माकर पाटोदेकर (वय-३०,रा.दक्षिण कसबा,शनी मंदिर जवळ,सोलापूर) हे जिनिग व डाल मिल व्यापारी आपल्या कुटुंबासह कार्यक्रमानिमित्त पुणे येथे गेले असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने डुप्लिकेट चावीचा वापर करत घरफोडी केली. 

चोरट्याने हॉलमधील टीव्ही टेबलच्या टॉवरमध्ये ठेवलेली चावी घेऊन पहिल्या मजल्यावरील बेडरूम मधील कपाटाचे लॉक काढून फिर्यादीने लाल रंगाच्या ट्रॅव्हलिंग बॅग मधील ५०० रुपये दराच्या १५ लाखाच्या नोटा, तसेच पिवळ्या रंगाच्या 

प्लास्टिक पोत्यामध्ये ठेवलेल्या ५००,२०० आणि १०० रूपये दराच्या १५ लाखाच्या नोटा,तसेच पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक मध्ये ठेवलेल्या ५००, २०० आणि १०० रुपये दराच्या १५ लाखाच्या नोटा अशा जवळपास ४५ लाखाच्या नोटा चोरुन नेल्या. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments